शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

संक्षिप्त पान २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:12 AM

फोटो - निधन माधुरी देशमुख अमरावती : माधुरी हनुमंतराव देशमुख (नांदसावंगीकर) (६५, रा. साईनगर) यांचे ९ जानेवारी रोजी निधन ...

फोटो - निधन

माधुरी देशमुख

अमरावती : माधुरी हनुमंतराव देशमुख (नांदसावंगीकर) (६५, रा. साईनगर) यांचे ९ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

---------------

फोटो - हिवरखेड १३ एस

हिवरखेड येथे वृक्षारोपण हिवरखेड : येथील बिगीनर इंग्लिश स्कूल व कमलाबाई नामदेवराव आमले पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक वैशाली आमले, शाळेचे संस्थापक अरविंद आमले, शिक्षक कल्पना महल्ले, निकिता वाघमारे, कमला आमले, रेखा आमले, वर्षा आमले, अभय होले, भूषण बेलसरे आदी उपस्थित होते.

------------

बकऱ्या चारण्यावरून वृद्धाला मारहाण

ब्राह्मणवाडा थ़डी : नजीकच्या खराळा शिवारात रामदास सुखदेवराव गजभे (५०) याने वासुदेव उके (७५) या वृद्धाला बकऱ्या येथे चारू नको , असे म्हणत शिवीगाळ केली व हातातील काठी हिसकून त्याने मारहाण केली. दोघेही बकऱ्या चारत होते. ते खराळा येथील रहिवासी आहेत. चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

-------------़

मंगरूळ चव्हाळा येथे विवाहितेचा छळ

गुरुकुंज मोझरी : ३० वर्षीय महिलेचा सासरी मंगरूळ चव्हाळा येथे माहेरहून २५ लाख रुपये आणण्यासाठी छळ करण्यात आला. याप्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ (अ), ३४ अन्वये श्रीकांत ज्ञानेश्वर शहाळे. ज्ञानेश्वर शंकर शहाळे, अमोल ज्ञानेश्वर शहाळे व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

बेलोरा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात दाखल झाली. ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. शुभम राऊत (रा. नेरपिंगळाई) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------

धारणी येथे दोन दुचाकींची धडक

धारणी : दुनी येथे एमएच २७ सीएल३२९६ क्रमांकाच्या दुचाकीने निघालेल्या ५० वर्षीय महिलेला एमपी १२ एमएच ६०९२ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. बोड फार्मजवळ ही ८ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-----------

मुलाला पित्याची काठीने मारहाण

तिवसा : तालुक्यातील मोझरी येथील प्रेमानंद पुंडलिकराव कांडलकर हा भावाला समजाविण्यास गेला असता, पुंडलिकराव कांडलकर (५०) याने त्याला काठीने मारहाण केली. १२ जानेवारी रोजी ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------

तळणी शिवारातून दुचाकी लंपास

मोर्शी : तालुक्यातील तळणी शिवारातून सुनील वामनराव बुरंगे (४५, रा. आनंदनगर, मोर्शी) यांची दुचाकी लंपास करण्यात आली. ८ जानेवारी रोजी ही घटना घडली. ते एमएच ३२ एजी ०९६५ क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून कापूस नेण्याकरिता गेले होते.

------------

पत्नीच्या अंगावर फेकली गरम भाजी

शेंदूरजनाघाट : नजीकच्या वाई येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार मिळाल्याने कैलास बाबूराव आहाके (३०) याने चुलीवर ठेवलेल्या मासोळीच्या भाजीचे आंदण पत्नी छायावर भिरकावले. त्याती ती भाजली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी भादंविचे कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जरूड : वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------

मकर संक्रांतीनिमित्त लावली दुकाने

टाकरखेडा संभू : मकर संक्रांतीच्या पर्वावर कामनापूर-निमखेड फाट्यावर निमखेडा येथील वेदांत तुकाराम महिंगे, धीरज पांडुरंग महिंगे, आशिष नीलेश मानकर, अमित पाटील, अविनाश सुधाकर महिंगे, आकाश प्रमोद धरपाळ या चिमुकल्यांनी बोरवनातील बोरे बोर वेचून छोटेसे दुकान मांडले. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

------------