शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करून युवकाची निर्घृण हत्या, पहाटे चार वाजता घडला थरार

By प्रदीप भाकरे | Updated: March 26, 2023 14:05 IST

गळ्यावर सपासप वार, मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

अमरावती: सिनेस्टाईल पाठलाग करून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास नजिकच्या नांदगाव पेठ येथे उघड झाली. या घटनेतील मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. पंचविशीतील त्या तरूणाचा गळा अत्यंत निर्दयीपणे कापण्यात आला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. तथा प्रथम मृताची ओळख पटविण्यासाठी चौकशीला वेग देण्यात आला आहे.

पहाटे चार वाजताच्या दरम्यान सर्व नागरिक साखरझोपेत असतांना अचानक एक तरूण जिवाच्या आकांताने पळत सुटतो.  जीव वाचविण्यासाठी एका घराचा दरवाजा ठोठावतो. त्या कुटुंबाला काही कळण्याचा आत दोघांपैकी एक जण धारदार शस्त्र काढून पळणाऱ्या त्या युवकाच्या गळ्यावर आणि शरीरावर सपासप वार करून पळून जातात. तो रक्ताच्या थारोळ्यात दरवाज्याजवळ रक्तबंबाळ स्थितीत कोसळतो. त्या घरातील कुटुंब तो प्रकार बघून भयभीत होतात. हे दृश्य कोण्या चित्रपटातील नसून रविवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ मधील शिव पार्वती नगर परिसरात घडलेली ती घटना आहे.

शिव पार्वती नगर परिसरातील निवासी लक्ष्मण शिंगणजुडे कुटुंब झोपेत असतांना अचानक एक २४ ते २५ वर्षाचा युवक हातात शर्ट घेऊन धावत धावत त्यांच्या व्हरांड्यात शिरला. जोरात दरवाजा वाजवत बचाव बचाव असे ओरडू लागला. अचानक दरवाजा वाजल्याने लक्ष्मण शिंगणजुडे झोपेतून खडबडून जागे झाले आणि दरवाजा उघडायला गेले. तेच त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडू नका, आधी खिडकीतून बघा, अशी सुचना केली.काय पाहिले बाहेरखिडकीबाहेर डोकावून पाहिेले असता, शिंगणजुडे दाम्पत्याला बाहेर २५ वर्षे वयोगटातील दोन युवक दिसले. पैकी एकाने मदतीसाठी हाका मारणाऱ्या त्या युवकाच्या मानेवर आणि शरीरावर सपासप वार केले. अन् ते फरार झाले. अगदी डोळयासमक्ष खून झाल्याने शिंगणजुडे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. श्वानपथक व ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. डीसीपी विक्रम साळी यांनी घटनास्थळी भेट दिली.तो युवक कोण होता?आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला. शिंगणजुडे दाम्पत्याकडून घटना जाणून घेतली. मृतक आणि मारेकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी आम्ही तपासाला वेग दिल्याचे नांदगावचे प्रभारी ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी सांगितले. मृत तरूण कुठला, तो पहाटे पहाटे लोकवस्तीत कसा शिरला, आरोपी त्याचा पाठलाग वाहनाने करीत होते का, मृत पायदळ होता, की वाहनाने, आरोपींनी त्याचा पाठलाग कुठून चालविला होता, अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी नांदगाव पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.आरोपी अज्ञात आहेेत. अद्याप मृत तरूणाची ओळख पटलेली नाही. अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताची ओळख पटल्यानंतर घटनेचा उकल शक्य होईल. तपास वेगाने सुरू आहे.विक्रम साळी, पोलीस उपायुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती