आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही या वेळी उपस्थित होत आहे.पेव्हर जाताहेत चोरीलाबीएसएनएलचे केबल गुरुवारी खोदकामादरम्यान तुटल्यानंतरही विभागाने मजीप्रावर कुठलीही कारवाई केली नाही. मजीप्राने नवीन पाइप लाइन टाकताना जुने पाइप काढले नाही. कारण त्यासाठी अतिरिक्त निधी खर्च करावा लागणार आहे. खोदकाम अतिरिक्त खोल करण्यात येत असल्याने इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे.पाइप लाइन टाकण्याचे कंत्राट नाशिक येथील एका कंत्राटदाराला मिळाले आहे. हे काम होत असताना मनपा किंवा मजीप्राचा कुठलाही अभियंता या ठिकाणी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे, काढलेले पेव्हर चोरीला गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात मजीप्रा कार्यकारी अभियंता कोपुलवार यांच्याशी संपर्क साधला; पण होऊ शकला नाही.अमृत योजनेच्या ११४ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामात गाडगेनगरातही शनिवारी काँक्रीट रस्ते फोडण्यात आले. येथे महिन्याभरापूर्वीच पेव्हर बसविण्यात आले होते.उपअभियंत्यांना पाठवून कामाची पाहणी करणाररस्त्याच्या मधोमध खोदून पाइप लाइन टाकणे हे नियमबाह्य आहे. यासंदर्भात मनपाच्या उपअभियंत्याना पाठवून कामाची पाहणी करणार असल्याचे मत अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेत मजीप्रा अधिकाºयांची एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ब्रेकिंग मशीनचा आवाज झाला बंदशनिवारी या परिसरात खोदकाम करण्याचे काम कंत्राटदारांनी बंद ठेवल्याची माहिती या प्रभागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे ब्रेकिंग मशीनच्या कर्कश्श आवाजापासून नागरिकांना काही प्रमाणात सुटका मिळाली आहे.मधोमध रस्ता फोडून कसे काय काम करण्यात येत आहे, हे मलाही समजले नाही. याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल.- जीवन सदार,अतिरिक्त शहर अभियंताअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ... : सदर कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिकेशी करार केला आहे. त्यानुसार मजीप्राला तातडीने पूर्ववत करून द्यावा लागणार आहे. परंतु, या ठिकाणी पाइप लाइन टाकल्यानंतर खोदकाम महिन्याभरापासून पूर्ववत करण्यात आलेले नाही व रस्तेही समतल करण्यात आले नाहीत. या ठिकाणी पसरलेली माती उचलून घ्यावी व फोडण्यात आलेले पेव्हर पूर्ववत करावे, अशी मागणी विनायकनगरातील नागरिकांनी केली आहे.
खोदकामात बीएसएनएलचे केबल तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:50 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरात अमृत योजनेंतर्गत पाइप लाइन टाकण्याची कामे सुरू आहे. त्यासाठी काँक्रीट रस्ते खोदकाम करण्यात आले. यावेळी बीएसएनएलचे अंडरग्रऊंड केबल तुटल्याने या परिसरात सेवा खंडीत झाल्याची नागरिकांची ओरड आहे.एका विभागाचा विकास करताना जर दुसऱ्या विभागाची नासधूस होणार असेल तर त्याला विकास म्हणायचा काय, असा सवालही ...
ठळक मुद्देनागरिकांचे दूरध्वनी बंद : कारवाईची अपेक्षा