आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनासमोर उत्पन्न खर्चाचे मेळ साधण्याचे आव्हान राहणार आहे.उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्याचे दृश्य परिणाम या अंदाजपत्रकावर जाणवण्याची शक्यता असून स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होणार काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ७४०.८३ कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांच्या वतीने स्थायी समितीसमोर मांडण्यात आले होते. या अंदाजपत्रकात ३४१.५० कोटी महसूल उत्पन्न, ३७६.८४ कोटी भांडवली उत्पन्न आणि २१.४९ कोटी असाधारण ऋण दाखविण्यात आले होते. यात आयुक्तांनी मांडलेला ४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायीने अमान्य केल्या व काही सुधारणा सुचविल्या. त्यानंतर ७७७.२६ कोटींच्या अर्थसंकल्पास सभागृहाने शिक्कामोर्तब केले. मालमत्ताकरातून ४५ कोटी अपेक्षित धरण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मार्च अखेरीस मालमत्ता करातून अवघे ३० कोटी रुपये येणेच अपेक्षित आहे. मालमत्ता मुल्यांकन व करनिर्धारण प्रकल्प राबविल्यास मालमत्ता कर १०० कोटींवर नेण्याचा संकल्प करण्यात आला. मात्र तो मार्च अखेरीसही पूर्णत्वास न आल्याने अर्थसंकल्पीय तरतुदींचा बोऱ्या वाजला आहे.वास्तवदर्शितेचे आव्हानउत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ न बसल्याने विपरित परिस्थिती येऊन ठेपली आहे. महापालिकेच्या दायित्वामध्ये गतवर्षीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. कंत्राटदारांचे देयक रखडली आहेत. या पार्श्वभूमिवर हे अंदाजपत्रक वास्तवदर्शी करण्याचे आव्हान स्थायी व प्रशासनासमोर असेल.
अंदाजपत्रकाची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:11 PM
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनासमोर उत्पन्न खर्चाचे मेळ साधण्याचे आव्हान राहणार आहे.
ठळक मुद्देवेध अर्थसंकल्पाचे : वस्तुनिष्ठतेवर भर