फोटो पी २५ येवदा टाकी
येवदा : दर्यापूर तालुक्यातील येवदा गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागते. त्यामुळे आठवडी बाजारातील शिकस्त झालेली पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधून देण्यात यावी, ही ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला आहे.
आठवडी बाजारातील शिकस्त झालेली पाण्याची टाकी पाडून ३.५० लाख लिटर क्षमतेची १४ मीटर उंच टाकी बांधण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून बांधकामाचे ई-टेंडरिंग व बांधकामाची वर्क ऑर्डरसुद्धा निघाली आहे. मजीप्राने येवदा ग्रामपंचायतीकडे सदर टाकी बांधकामासाठी जागा उपलब्ध करून, त्याबाबतचे दस्तऐवज सादर करण्यात यावे, असे लेखी पत्र दिले. येवदा ग्रामपंचायतकडून पूर्तता झाली नसल्याने टाकीचे बांधकाम रखडले आहे. नवीन टाकीचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदीप वडतकर यांनी दिला.