श्रावण लांजेवार (७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. श्रावण हे गावाशेजारच्या पाच एकर शेतीत दुपारी बैलबंडी घेऊन गेले होते. या परिसरात दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत संततधार पावसाने हजेरी लावल्याने रामगाव पांदण रस्त्याच्या नाल्याला अचानक पूर आला. पुरातून बैलबंडी काढताना पलटी झाली. दोन्ही बैल पळून घरी आले. मात्र, श्रावण लांजेवार हे घरी न आल्यामुळे त्यांचा नातू मंगेश याने शोधाशोध केली. त्यातच रामगाव पांदण रस्त्याच्या नाल्यात वाहून गेलेल्या पुरात बंडीच्या खाली आजोबाचा मृतदेह दिसला. येथील सरपंच रुपेश गुल्हाने व माजी सभापती पंकज वानखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चांदूर रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. एक तासानंतर मृत श्रावण लांजेवार यांचा मृतदेह आढळला. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.
नाल्याच्या पुरात बैलबंडी उलटली, वृद्ध शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:17 AM