मनीष कहाते।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील जवाहर गेटच्या आत असलेल्या सराफा बाजारामध्ये लॉकडाऊनच्या काळात सोन्या, चांदीच्या व्यापाराची कोरोडो रुपयंची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. आजही सराफा बाजारात ग्राहकांची केवळ ५ ते १० टक्केच वर्दळ आहे. त्यातच पार्कींग नसल्याने अर्धा व्यापार संपला आल्याचे सराफा व्यापारी असोशियन ने सांगितले.मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतच सोन्या, चांदीचा व्यापार होतो. याच कालावधीत लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा फटका सराफा व्यापाऱ्यांना बसला. सराफा बाजारात छोटे-मोठे सुमारे २०० व्यावसायिक आहेत. संपूर्ण बाजारपेठ शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने बाजारात ग्राहकी नाही. त्यातच सोन्याचे भाव प्रतीग्रॅम ६० हजारांच्या आसपास झाले होते. भाव ६५ ते ७० हजारांच्या घरात जातील असा अंदाज बहुतांश व्यापाऱ्यांनी बांधल्यामुळे ५५ ते ६० हजारांच्या भावात सोन्याची साठवणूक केली. परंतु भाव नंतर कमी होत गेले. हल्ली ५१ हजारांच्या घरात सोन्याचे भाव आहेत. सोने साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. व्यापाºयांना तेजीचा फायदा व्यापाऱ्यांना झालाच नाही. ज्यांच्या घरी लग्नादी कार्ये आहेत अशांनी चढ्या भावाने सोने खरेदी केले खरे परंतु तशा ग्राहकांची संख्या अल्प आहे.
सराफात ६०० कारागीरशहरात मोठमोठे शोरू म लागले आहेत. पार्कींगची भरपूर जागा उपलब्ध आहे. भावामध्ये विशेष तफावत नाही. त्यामुळे सराफा बाजारातील ग्राहक कमी झाले आहे. सराफा बाजारावर सुमारे ५०० ते ६०० कारागीर अवलंबून आहेत. सेल्समन आहेत. लॉकडाऊनमध्ये कारागीरांना व्यापाऱ्यांनी आर्थिक मदत केली आहे.
कलकत्ता, मुंबई, जळगावातून येते सोने, चांदी, डायमंडसरफा बाजारात कलकत्ता, मुंबई, जळगाव इत्यादी बाजारपेठेतून सोने, चांदी आणि डायमंड येतात. काही चांदीच्या वस्तू येथेच तयार होतात. सोन्याचे मोठ्या प्रमाणात तयार दागिने मुंबईहून येथे येतात. लॉकडाऊनच्या काळात सोने व्यापाºयात अंदाजे ३५ ते ४० कोटी रू पयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यापारी असोसिएशनने व्यक्त केला. अलिकडे ग्राहक पिढीजात सराफा दुकानदारांकडून खरेदी न करता इतरत्र सोन्याचे दागिणे खरेदी करीत आहे. येथे साईनगर, कंवर नगर, मोतीनगर, राठीनगर, बडनेरा रोड, जापेठ इत्यादी भागातील मिळून ४०० पेक्षा अधिक सोन्या चांदीची दुकाने आहेत. मुख्य सराफा बाजारावार त्याचाही विपरीत परिणाम झाला आहे.