फोटो पी २२ अंजनगाव सुर्जी
पान २ ची सेकंड लिड
अंजनगाव सुर्जी : येथील दत्त मंदिरातील धाडसी चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगारास पकडल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. शेख आरीफ ऊर्फ काल्या शेख हारुण (३६, रा. धामणगाव चोरे, जि. अकोला) असे अटक आरोपीचे नाव आहे.
अज्ञात चोराने दत्त मंदिर अंजनगाव येथून चांदीचा पाळणा, पादुका, पितळी मूर्ती असा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार १४ मार्च रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने २० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अंजनगाव हद्दीत पेट्रोलिंगकरिता गेला असता गुप्त बातमीदाराकडून अंजनगाव येथील दत्त मंदिरातील चोरी काल्या (आरीफ रा. धामणगाव चोरे जिल्हा अकोला) याने केल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन धामणगाव चोरे येथे सापळा रचून आरोपी नामे शेख आरीफ उर्फ काल्या शेख हारुण याला ताब्यात घेतले. त्याने दत्त मंदीर अंजनगाव सुर्जी, गुलजार पुरा, मोचीपुरा येथील घट, अकोट रोडवरील बिअर बार फोडून चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपी कडुन मंदीर चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागीने, चांदीचे दागीने , मोबाईल व नगदी २७०० रु. असा एकुण ५७ हजार १६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या अटकेने चार गुन्हे उघडकीस आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हरि बालाजी एन, अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पो.उप.नि.आशिष चौधरी, स.पो.उप.नि.संतोष मुंदाने, नापोको रविंद्र बावणे, नापोको पुरुषोत्तम यादव, पोकॉ दिनेश कनोजीया, पोकॉ पंकज फाटे, पोहेकॉ निलीन कळमकर व सायबर सेल यांनी केली आहे.