आॅनलाईन लोकमतअमरावती: ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते. ६० ते ७० टक्के दस्तावेज जळाले असून, ३० टक्के महत्त्वाचे दस्तावेज वाचविण्यात यंत्रणेला यश आले आहे. कनिष्ठ व वरिष्ठ पातळीवर सदर दस्तावेज सेफ असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजनेकर यांनी दिली आहे.सदर आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली की इतर कारणामुळे लागली, याची चौकशी सुरू आहे. मात्र, या आगातून सावरून एका दिवसाच्या आतच जलसंपदा विभागाने एक निवासस्थान या कार्यालयासाठी दिले असून, बुधवारपासून या कार्यालयात तात्पुरते आॅफीस सुरू करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्यासह २२ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत.यांत्रिकी विभागाचे नाशिक येथील मुख्य अभियंता अशोक बोडखे हे रात्री उशिरा अमरावतीत आले. त्यांनी बुधवारी सकाळी जळालेल्या साहित्याची व विभागाची पाहणी केली आणि कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. नागपूरचे अधीक्षक अभियंता सी.बी. मडामे व कार्यकारी अभियंता अनिल राजनेकर यांनीसुद्धा पाहणी केली होती. यांत्रिकी विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून जे रेकॉर्ड व पत्रव्यवहार कार्यकारी अभियंता कार्यालयाला पाठविण्यात आला, तो पुन्हा मागविण्यात येणार आहे तसेच अधीक्षक अभियंता कार्यालय, नागपुर या ठिकाणी पाठविलेले रेकॉर्डसुद्धा रिकव्हर करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयाचे रेकॉर्ड सेफ असल्याचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सव्वाचार लाखांचे नुकसानआगीत जळून खाक झालेल्या साहित्याची प्राथमिक किंमत ही सव्वाचार लाख एवढी काढण्यात आली आहे. यामध्ये पाच कम्प्यूटर, दोन प्रिंटर, २० टेबल व २० खुर्च्यांचा समावेश आहे. २२ आलमाऱ्यासुद्धा जळून खाक झाल्या आहेत. असे एकूण सव्वाचार लाखांची नुकसान झाले आहे. सदर इमारत ही ३५ वर्षांपूर्वीची आहे. बाजूला कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.आस्थापना विभाग व इतर विभागांचे रेकॉर्ड जळाले आहे. ते कनिष्ठ व वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात येणार आहेत. जे काही दस्तावेज आगीतून वाचले, त्यांची पडताळणी सुरू आहे. सव्वाचार लाखांचे नुकसान झाले आहे.- अनिल राजनेकरकार्यकारी अभियंता (यांत्रिकी) जलसंपदा, अमरावती.
जळालेले रेकॉर्ड अन्य कार्यालयांमध्ये सेफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:13 PM
ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते.
ठळक मुद्देकार्यालय नवीन जागी : सीईकडून घटनास्थळाची पाहणी