खारमुरे, पाॅप कॉर्नसह फळे विकून चालवायचे संसार
अमरावती : लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला होता. अशा परिस्थितीत बस स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरही उपासमारीची पाळी आली होती. यादरम्यान मिळेल ते काम करून त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविली. परंतु, आता ॲनलॉकनंतर त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली आहे.
दररोज दररोज ८०० फेऱ्या
अनलॉकनंतर सध्या अमरावतीच्या मध्यवती बसस्थानकाहून दररोज ८०० बसफेऱ्या होतात. यात प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे बसस्थानकावरील खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची चांगली कमाई होत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बाॅक्स
मजुरी करून उदरनिर्वाह
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यामुळे व्यवसाय बंद होता. कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी अन्य मजुरीचे कामे करून कुटुंबाची उपजीविका भागविली.
बॉक्स
मिळेल ते काम केले
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद होता. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुसरे मिळेल ते काम करून आपल्या संसाराची उपजीविका भागविली.
बॉक्स
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, शहरातच वेळेवर मिळेल ते कामे करून मिळणाऱ्या मोबदल्यातून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविली आहे. आता जेमतेम बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू केला.
बॉक्स
एसटी महामंडळाला द्यावे लागतात पैसे
बसस्थानकावर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना एसटी महामंडळाला शुल्क द्यावे लागते. संबंधित विक्रेता कोणती वस्तू विकतो, यावरून त्याला किती पैसे द्यायचे, याचा भाव ठरतो. ५०० ते १००० रुपये महिन्याकाठी या विक्रेत्यांना आकारण्यात येतात. त्यानुसार त्यांना विक्रीची परवानगी दिली जाते.
बॉक्स
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या फेऱ्या ८००
स्थानकातील विक्रेते
०९