शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

पणन करणार १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:35 PM

जिल्ह्यात पणन विभागातर्फे १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी धामणगाव केंद्रांवर २९ शेतकºयांचे ७१५ क्विंटल सोयाबीन खरेदी गुरुवारी करण्यात आली.

ठळक मुद्देधामणगावात खरेदीला सुरुवात : जिल्हा उपनिबंधकांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात पणन विभागातर्फे १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. यापैकी धामणगाव केंद्रांवर २९ शेतकºयांचे ७१५ क्विंटल सोयाबीन खरेदी गुरुवारी करण्यात आली. ग्रेडरसंदर्भातील समस्या निकाली निघाली असून, शेतकºयांना सूचना देऊन सोयाबीनची खरेदी करण्यात येईल. प्रतवारीनुसार दरासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सांगितले.नाफेड केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी झालेली असतानाही प्रत्यक्ष सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. यादरम्यान जिल्ह्यातील दोन लाख क्विंटल सोयाबीन बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा कमी भावाने विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर सोयाबीन खरेदीसंदर्भात ग्रेडरची समस्या निकाली काढून केंद्रांना सूचना देण्यात आल्यात. पणन विभागानेदेखील केंद्रावर सोयाबीनसह मूग व उडीद विक्रीसाठी आणताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शेतकºयांनी नोंदणी करण्यासाठी सातबारा, आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स, स्पेसीफिकेशनप्रमाणे एफएक्यू प्रतीचा व चाळणी मारून माल आणावा. यामध्ये कमाल आर्द्रता मर्यादा १२ टक्क्यांपर्यत असावी. शेतमालाच्या खरेदीनंतर शेतकºयांच्या थेट बँक खात्यात एका आठवड्याच्या आत रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात १,८९७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणीनाफेडच्यावतीने खरेदी करण्यात येणाºया शेतमालासाठी १२ केंद्रांवर १,८९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. यामध्ये मुगासाठी ५९०, सोयाबीनसाठी ६४७, तुरीसाठी २७३ व उडिदासाठी ३८७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सोयाबीनसाठी अचलपूर १४४, अमरावती ७५, अंजनगाव सुर्जी ९, चांदूर बाजार १०, चांदूर रेल्वे १८७, धामणगावरेल्वे १९८, मोर्शी १६, नांदगाव खंडेश्वर ७९ तिवसा १६ व वरूड केंद्रावर ४ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.