लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विधेयकाला विरोध करण्यासाठी उम्मत हेल्पलाइन या मुस्लिम महिलांच्या संघटनाद्वारे तसेच अमरावती वूमेन्स अँड गर्ल्स अॅक्शन कमिटी या विद्यार्र्थिनींच्या संघटनाद्वारे शुक्रवारी दुपारी गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झालेत. यामध्ये महिला व युवतींनी मार्गदर्शन केले आणि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी निलोफर यास्मीन अब्दुल हकीम, शगुफ्ता परवीन रफीक अहमद, कैसर शोएब खान, डॉ. शबनम हुसेन, हाजिबाबी मिसबाह एरम, कौसर खान, हाबिजाबी युसूफ, आफरीन बानो, जोहा खान, वाजेदा खान यांच्यासह हजारो महिला, युवती उपस्थित होत्या.
सीएए, एनआरसीला मुस्लिम विद्यार्थी, महिला संघटनांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM
केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
ठळक मुद्देकलेक्ट्रटवर मोर्चा : दोन्ही समाजाच्या भावनांशी शासनाचा खेळ