लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केबल ग्राहक वाहिन्यांच्या प्रक्षेपणापासून वंचित राहत असल्यामुळे बुधवारी शहरातील काही केबल आॅपरेटरांनी हमालपुरा स्थित एमएसओ कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी एकाधिक सिस्टम आॅपरेटर (एमएसओ) यांचे प्रतिनिधी व केबल आॅपरेटर यांच्यात वाद झाल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. अखेर कार्यालय बंद करून एमएसओ यांचे प्रतिनिधी तेथून निघून गेले. या घटनेमुळे अमरावती शहरात केबल वॉर सुरू झाल्याची चर्चा रंगली.पूर्वी विविध कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्यानंतर केबल आॅपरेटरांचे वाद उफाळून येत होते. एकमेकांचे केबल तोडणे किंवा चोरण्याचे प्रकार होत होते. अनेकदा ग्राहक मिळविण्यासाठी केबल आॅपरेटरांची चढाओढ लागत होती. त्यावेळी केबल वॉरची चर्चा होती.ट्रायने केबल ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या निवडीची संधी दिली. त्यानुसार एमएसओंनी नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली. एमएसओमार्फत केबल आॅपरेटरांनी पॅकेज प्रणालीचे अर्ज ग्राहकांकडून भरून घेतले. केबल ग्राहकांनी आॅपरेटरांना पैसे भरल्यानंतरही, अनेक ग्राहकांकडील वाहिन्याचे प्रक्षेपण सुरूच झाले नाही. प्रक्षेपण सुरू न झाल्याने ग्राहक केबल आॅपरेटरांकडे चकरा घालत आहेत. ग्राहकांचा रोष पाहून अखेर केबल आॅपरेटर प्रकाश गिडवाणी, परमानंद शर्मा महाराज, मलखान मांजरे, अमोल शेळके, प्रवीण दुधे, सुधीर टेटू, अलताफ खान, निलेश वाघ, नागपुरे, विनोद मार्तंड, राजू गरवे, देवानंद इचे आदीनी हमालपुऱ्यातील जीटीपीएल कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवा व ग्राहकांचे प्रक्षपेण सुरू करा, अशी मागणी केबल आॅपरेटरांनी रेटून धरली.दरम्यान, मंगळवारी रात्री तर काही केबल आॅपरेटरांनी कंपनीच्या कार्यालयातच रात्र काढली. बुधवारी दुपारी कंपनीचे प्रतिनिधी चर्चेसाठी कार्यालयात पोहोचले. चर्चा सुरू असतानाच कंपनी प्रतिनिधी व केबल आॅपरेटरांचा वाद होऊन प्रचंड गोंधळ उडाला.ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्या निवडून आमच्याकडे पैसे भरले. त्यांच्या वाहिन्या अॅक्टिव्हेट केल्या तरीसुद्धा कंपनीकडून सुरू झाल्या नाहीत. ग्राहकांचा रोष वाढल्याने जीटीपीएलच्या अधिकाºयांशी चर्चा केली. त्यावेळी वाद निर्माण झाला.- प्रकाश गिडवाणीकेबल आॅपरेटरकेबल आॅपरेटरांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अडचणी दूर केल्या. आमच्या कंपनीची सिस्टीम योग्यरीत्या सुरू असून, काही अडचणी नाहीत. काही केबल आॅपरेटरांचे आपसी मतभेद असल्यामुळे गोंधळ झाला.- समीर चौबेशाखाप्रमुख, जीटीपीएल
अमरावतीत 'केबल वॉर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:10 PM
केबल ग्राहक वाहिन्यांच्या प्रक्षेपणापासून वंचित राहत असल्यामुळे बुधवारी शहरातील काही केबल आॅपरेटरांनी हमालपुरा स्थित एमएसओ कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी एकाधिक सिस्टम आॅपरेटर (एमएसओ) यांचे प्रतिनिधी व केबल आॅपरेटर यांच्यात वाद झाल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. अखेर कार्यालय बंद करून एमएसओ यांचे प्रतिनिधी तेथून निघून गेले. या घटनेमुळे अमरावती शहरात केबल वॉर सुरू झाल्याची चर्चा रंगली.
ठळक मुद्देआॅपरेटरांचा ठिय्या : हमालपुऱ्यातील एमएसओ कार्यालयातील घटना