शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

वाहतूक कोंडीबाबत संयुक्त बैठक बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:09 PM

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यासह नगरसेवक आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी शहरातील रस्ते खोदून ठेवले व कामे संथगतीने होत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, यासाठी या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह नगरसेवकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे केली.शहरात बांधकाम विभागाद्वारा काँक्रिटीकरणासाठी सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते, नाल्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. शहरात चार ते पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. कामाचे नियोजन नसल्याने कामे केव्हाही बंद अन् सुरू करण्यात येतात. महावितरण व मजीप्राच्या कामांचीही हीच स्थिती आहे. यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत. वाहतूक पोलीसही या ठिकाणी राहत नाही. केबल टाकण्यासाठी केव्हाही चांगले रस्ते फोडण्यात येत आहेत. कोणत्याही यंत्रणेचा कोनाशी ताळमेळ नाही. एका विभागास विचारणा केली तर दुसºया विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येतो. यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने यासर्व विभागाची संयुक्त बैठक बोलावून कामांचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्यांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, अन्यथा काँग्रेस पक्षाद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, मनोज भेले, प्रशांत डवरे, शोभा शिंद, योगेश गावंडे, सुनील इंगोले, शरद ठोसरे, अनिल वनवे, आकाश सोनटक्के, अनिल काळे, उमेश ठाकरे, देवचंद शेंडे, आकाश मानकर, रवींद्र धानोरकर, निलेश शर्मा, बबलू दुबे आदी उपस्थित होते.पोलिसांचे वाहतुकीकडे कमी, वसुलीकडे अधिक लक्षशहरातील वाहतूक शिपायांचे वाहतुकीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष असून, केवळ वसुलीकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे जीवघेणी वाहतूक बोकाळली व लहान-मोठे अपघात होत आहेत. कामावर कंत्राटदारांची मनमानी आहे. मोठे कंत्राटदार ऐकत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. नियोजनाअभावी कंत्राटदारांनी शहरात धिंगाणा घातला आहे. एक विभाग केवळ दुसºया विभागाकडे बोट दाखविण्यात धन्यता मानत आहे. यासाठी या सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून नियोजन ठरविणे महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.