लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील हत्याकांडाचे तपासकार्य अंतिम टप्प्याकडे आहे. आता केवळ शीतल पाटीलचा विहिरीत फेकण्यात आलेला मोबाइल शोधण्याचे आव्हान कायम आहे. त्यासाठी खोल पाण्यात जाऊ शकणाऱ्या पाणबुड्यांचा शोध पोलीस घेत आहेत.शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी सुनील गजभियेसह साथीदार रहमान खान, गुन्ह्यात मदत करणारी पत्नी राजेश्री व आश्रय देणाºया शिवदास गोंडाणेला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीअंती सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविले. या हत्याकाडांविषयी सर्व बारीकसारीक बाबींची नोंद पोलिसांनी घेतली आहे.नागपूर पोलिसांशी संपर्कआता शीतलचा मोबाईल शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मोबाइलच्या शोधाकरिता पाणबुड्यांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने गाडगेनगर पोलिसांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले. आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पाणबुडे शोधण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूर येथील पोलिसांशी त्यांनी संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडे प्रशिक्षित पाणबुडे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठ्या शहरांतील पोलीस विभागाशी संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाशीही सपर्क करण्यात येत आहे. शीतल पाटील हत्याकांडाच्या तपासकार्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी परिश्रम घेतले असून, त्यांचे तपास कार्य आता अंतिम टप्प्यात आहे. पोलीस आता दोषारोपपत्र तयार करण्याच्या तयारीला लागले आहे.सुनील गजभियेचा न्यू बराकीत मुक्कामशीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभियेला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याला कारागृहातील न्यू बराकीत ठेवण्यात आले असून, अन्य कैद्यांप्रमाणेच त्याच्याविषयीच्या इत्थंभूत माहितीची नोंद कारागृह प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विहिरीतील मोबाइल बाहेर काढण्यासाठी पाणबुड्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न होत आहेत.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्तशीतल पाटील हत्याकांडातील बारीक-सारीक बाबी तपासून पाहिल्या जात असून, आता तपासकार्य अंतिम टप्प्याकडे आहे. आता दोषारोपपत्राची तयारी सुरू आहे.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षक
मोबाईल शोधण्यासाठी पाणबुडे बोलाविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:24 AM
शीतल पाटील हत्याकांडाचे तपासकार्य अंतिम टप्प्याकडे आहे. आता केवळ शीतल पाटीलचा विहिरीत फेकण्यात आलेला मोबाइल शोधण्याचे आव्हान कायम आहे. त्यासाठी खोल पाण्यात जाऊ शकणाऱ्या पाणबुड्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
ठळक मुद्देतपास अंतिम टप्प्यात : गाडगेनगर पोलीस दोषारोपपत्राच्या तयारीत