आंदोलन : केंद्रावर तूर खरेदी सुरू, शेतकऱ्यांचा जल्लोष, तीन आठवड्यानंतर दिलासालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी सुरू झाल्यास १० मे रोजी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये डेरा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील दर्यापूर, चांदूरबाजार, अचलपूर, अमरावती बाजार समितीमध्ये प्रहारचे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन करण्यात आले. यानंतर बहुतांश ठिकाणी तूर खरेदी सुरळीत सुरू झाली. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सकाळी ११.३० वाजता प्रहारतर्फे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनातील शेतकऱ्यांचा सहभाग व संभाव्य तणावाची शक्यता पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी प्रहारचे पदाधिकारी तथा बाजार समिती संचालक गजानन मोरे, संजय तट्टे, दीपक भोरे, अंकुश जवंजाळ, मोहन वानखडे, दिलीप जवंजाळ, पोपट घोडेराव, मंगेश हुड, प्रदीप आखूड, दीपक धूळधर, भास्कर मासुदकर यावेळी उपस्थित होते. या आंदोलनानंतर बाजार समिती सचिव मंगेश भेटाळू यांनी शेतकऱ्यांची २०० पोते तूर घेऊन त्यांना टोकन दिलेचांदूरबाजारमध्ये आनंदोत्सव तूर खरेदीकरिता प्रहारतर्फे डेरा आंदोलन करण्यात आल्यानंतर तूर खरेदी सुरू करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रहारचे मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, तुषार पावडे, विनोद जंवजाळ, दीपक भोंगाडे, संतोष किटुकले, सरदारखाँ, मुजफ्फर हुसैन, सुभाष मेश्राम आदींची उपस्थिती होती.मोर्शीत तहसीलदारांना निवेदनबाजार समितीमध्ये प्रहार संघटनेव्दारा बुधवारी डेरा आंदोलन करण्यात आले. तूर खरेदीसंर्दभात तहसीलदार अनिरुध्द बक्षी यांना निवेदन देण्यात आले. ३१ मेपर्यत तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रहारचे उप जिल्हाप्रमुख अनिल खांडेकर, दद्दू श्रीवास, नईम खान, गजानन काळे, विजय पाचारे, प्रवीण तट्टे आदी उपस्थित होते.
तूर खरेदीसाठी प्रहारचा ठिकठिकाणी डेरा
By admin | Published: May 11, 2017 12:13 AM