सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. पाण्याच्या अपव्ययाकडे संबंधित प्रशासनाने सपेशल दुर्लक्ष केले आहे. आधीच अप्पर वर्धा धरणात पाणी नाही. त्यात वाया जाणाºया पाण्यासाठी जबाबदार म्हणून अधिकारी वर्गावर आता कारवाई होणार का, हा प्रश्न शेतकरी वर्ग विचारत आहे.तालुक्यातील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या कापसाचे उत्पादन समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून, शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघू पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचऱ्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तिवसा सिंचन विभागाचे अभियंता लकडे यांनी पाहणी केल्यानंतर प्रतिक्रिया देऊन, असे ‘लोकमत’ला सांगितले.धरणात आधीच जलसाठा कमी आहे. त्यात कालव्याच्या दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने पाणी वाया जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. मात्र, इकडे कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.- प्रणव गौरखेडेयुवा शेतकरी, तिवसा
कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:12 PM
यंदा जिल्ह्याला कोरड पडली असून, अप्पर वर्धातच काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातही शेतकरीहित लक्षात घेता, रबी हंगामासाठी अप्पर वर्धा धरणातून कालव्याला शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. मात्र, तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या सातरगाव रोडवरील बदबदाजवळ कालव्याच्या अस्तरीकरणाला मोठा सुरुंग लागला असून, यातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : कालवे विभागाला केव्हा येणार जाग?