वरूड :- स्थानिक नवनाथ मंदिर ते कोसे ले-आऊट पर्यंत कोणतीही लोकवस्ती नसताना केवळ पदाधिकाऱयांच्या भूखंडमध्ये सुविधा होण्याचे दृष्टीने रस्ता आणि नाल्याच्या तांत्रिक मंजुरीकरिता नगर परिषदेने पैशाचा आभारणा केला आहे. शहरातील अनेक भागात नाल्या , रस्ते नसताना जिथे लोकवस्ती नसताना ले-आऊट धारकांच्या फायद्यासाठी न. प पदाधिक्कारयांच्या संगनमताने रस्ता नाल्या बांधकामाचा घाट रचल्याची तक्रार नगर सेवक मुन्ना उर्फ सौरभ तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत करून सदर रस्ता आणि नाल्या रद्द करण्याची मागणी केली आहे .
तक्रारी नुसार, नवनाथ मंदिर ते कोसे ले -आऊटपर्यंत रस्ता आणि नालीच्या तांत्रिक मंजुरीकरिता नगर परिषदेने दोन वेळ पैसे बहरले . नगरसेवक म्हणून स्वतः पाहणी केली असता येथे कोणतीही लोकवस्ती नसून या रस्त्याचा नागरिकांना कोणताही फायदा मिळणार नसून केवळ शेतात जाण्याकरिता मार्ग तयार होणार आहे . जिथे लोकवस्ती नसताना ले-आऊट धारकांच्या फायद्यासाठी न. प पदाधिक्कारयांच्या संगनमताने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून लाखो रुपयांचा रस्ता नाल्या बांधकामाचा घाट रचला. अधिकाऱयांनी केवळ हा रस्ता टाकण्याकरिता एक दिवाच प्रभार कठाळे नामक अभियंत्याने घेऊन रस्ता मंजूर केल्याचा आरोप नगरसेवक तिवारी यांनी तक्रारी मध्ये केला आहे . यामुळे नागरिकांची दिशाभूल केल्या जात असून अनेक वेळा मुख्याधिकारी यांना माहिती मागितली परंतु देण्यास टाळाटाळ केली . शहरातील अनेक भागात नाल्या रस्ते नसताना केवळ भूखंडधारक हे पदाधिक्कारि असल्याने यांचे फायद्याकरिता वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ठराव घेतलेल्या रस्त्याची चौकशी करून मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक मुन्ना उर्फ सौरभ तिवारी यांनी जिल्हाधीकारी अमरावती यांना लेखी तक्रार देऊन केली आहे .
* रस्त्याचा वापर केवळ जनावरे आणि शेतात जाण्यासाठीच - नगर सेवक तिवारी
वैशिष्ट्यपूर्ण निधीतून होत असलेला रस्ता नवनाथ मंदिर ते कसे ले - आऊट पर्यंत करण्यात येणार असून या भागात कोणतीच लोकवस्ती नसून केवळ शेतात जाण्यायेण्यासाठीच नगर परिषद निधीचा दुरुपयो केला जात आहे . न.प पदाधिक्कारयांची शेतजमीन याच भागात असल्याने स्वार्थापोटी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यानी संगनमताने हा ठराव घेऊन रस्ता तयार करण्याचा घाट रचला . मात्र या रस्त्याने कोणत्या पक्षाची जनावरे जाणार हा प्रश्न आहे .नागरिकाना या रस्त्याचा कोणताही लाभ मिळणार नसल्याने सदर रस्त्याची मंजुरात रद्द करण्यात यावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे नगर सेवक मुन्ना उर्फ सौरभ तिवारी यांनी सांगितले.