लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्राच्या परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळूरू येथील मार्इंड लॉजिक कंपनीसोबतचा असलेला करार रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी विद्यापीठात धडक दिली. निकालातील दोष, त्रुटींना ही एजन्सी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला.दिनेश सूर्यंवशी यांच्या नेतृत्वात भाजयुमोने विद्यापीठात धडक देत ‘मार्इंड लॉजिक’ ला लक्ष्य केले. गत दोन वर्षांपासून आॅनलाईन निकाल, परीक्षेत गोंधळ, त्रुटी व अन्य बाबींना हीच एजन्सी जबाबदार असल्याबाबत काही मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले. विद्यापीठाने ३१(१) कलमान्वये विद्यार्थ्यांची सनद तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे हक्क, अधिकार बहाल करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, धम्मराज नवले, मुकेश कंठाळे, त्रिकाल अडसड, समीर ठाकरे, अतुल गोडे, तुषार बायस्कर, धीरज राखोंडे अनिकेत शेगोकार आदींनी अन्यायकारक विद्यार्थ्यांची बाजू विद्यापीठाच्या पुढ्यात मांडली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक हेमंत देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे रवींद्र सरोदे आदींनी भाजयुमोची भूमिका समजावून घेतली.भाजयुमोने माइंड लॉजिक एजन्सीबाबत निवेदन दिले आहे. यातील काही बाबींवर प्रशासन नक्कीच लक्ष वेधणार आहे. येत्या १० दिवसांत योग्य ती कार्यवाही केली जाईल.- राजेश जयपूरकर,प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
मार्इंड लॉजिक’चा करार रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 9:46 PM
येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्राच्या परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळूरू येथील मार्इंड लॉजिक कंपनीसोबतचा असलेला करार रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी विद्यापीठात धडक दिली. निकालातील दोष, त्रुटींना ही एजन्सी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
ठळक मुद्देभाजयुमोची मागणी : निकालातील दोष, त्रुटींना एजन्सी जबाबदार