मेघना मडघे यांची मागणी
मोर्शी : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे भाव दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तर केंद्र शासनाने दीड लाखाची कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांनी कर्जापायी जीवन संपवू नये, त्याची दखल केंद्र शासनाने घ्यावी व रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती त्वरित कमी करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रदीप कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिले आहे, तसेच आष्टगाव येथील शेतकरी अतुल म्हाला यांच्या शेतातील दोन वर्षे अगोदर वाळलेल्या संत्रा झाडाचे पैसे अद्यापही मिळाले नाही, असे लाखो शेतकरी संत्रा नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित आहे, असे मडघे यांनी सांगितले.