शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

चांदूरच्या बाजार समितीत उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

By admin | Published: September 10, 2015 12:12 AM

तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चांदुरबाजार बाजार समितीच्या निवडणुकीत रिंगणात असणारे उमेदवार आपला गट सोडून वैयक्तिक मतांची मागणी करीत असल्याचे चित्र आहे.

तोडफोडीचे राजकारण : देशमुख-ठाकरे यांच्या खेळीकडे लक्षसुमित हरकुट  चांदूरबाजारतालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चांदुरबाजार बाजार समितीच्या निवडणुकीत रिंगणात असणारे उमेदवार आपला गट सोडून वैयक्तिक मतांची मागणी करीत असल्याचे चित्र आहे.कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल असणाऱ्या या बाजार समितीवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळावा, यासाठी दोन्ही गटातील उमेदवारांनी मतदारांचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे. यासाठी सहकारक्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी सध्दा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सद्यस्थितीत अचलपूर बाजार समितीवर प्रहार समर्थित शेतकरी पॅनलची सत्ता आहे. सध्या शेतकरी पॅनलचे मनोबल वाढले असून तुल्यबळ लढत असूनही सहकार पॅनलला घरचा अहेर मिळाल्याने सत्तेपासून दूर रहावे लागले. बाजार समितीत १८ जागांसाठी ३८ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. सेवा सहकारी मतदारसंघासाठी ११ जागा आहेत. मात्र, सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. प्रहार समर्थित शेतकरी पॅनल तोडफोडीचे राजकारण करून सहकार पॅनलला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. अडते व व्यापारी मतदारसंघात सहकार पॅनलचे मनोज नांगलिया, अमोल लंगोटे रिंंगणात आहे. काही मतदारांनी व्यापारी मतदारसंघात आपला काटा काढण्यासाठी बच्चू कडुंच्या शेतकरी पॅनलला साथ दिल्याने सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. मापारी व हमाल मतदारसंघात अ.सत्तार खाँ व गोपाल सोनवणे यांच्यात काट्याची लढत होण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलमध्ये बबलू देशमुख, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे यांच्यासारखे मातब्बर नेते एकवटले आहेत. शेतकरी पॅनलमध्ये बहुतांश उमेदवार वसुधा देशमुख यांचे अतिविश्वासू कार्यकर्ते असल्याने वसुधा देशमुख यावेळी नेमकी कोणती खेळी खेळणार, याकडे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.