शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता

By admin | Published: February 10, 2017 12:13 AM

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे.

फ्लेक्सकडे लक्ष : संपदेतून जाहीर होणार समाजसेवा अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय चांगला ठरणारा आहे. राजकीय पक्षाने किती उमेदवार दिले ही माहिती सहजतेने उपलब्ध होईल. मात्र प्रतीज्ञा पत्रात उमेदवारांनी जाहीर केलेली स्थावर व जंगम मालमत्ता किती? याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारांना मालमत्तेची माहिती प्रतीज्ञा पत्राद्वारे अनिवार्य केलीे आहे. यात उमेदवारांकडे किती ‘लक्ष्मी’ आहे, हे जाहीर होणार आहे. याच ३ बाय ४ फूट आकार असलेल्या फ्लेक्सच्या आधारे रिंगणातील उमेदवार आमने- सामने येणार आहेत. प्रचारात स्थावर व जंगम मालमत्तेचा मुद्दा उपस्थित करुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होणार आहे. आयोगाने नियम व कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रियेला वळण लावले आहे. अलिकडे राबविली जाणारी आदर्श आचार संहिता ही भयमुक्त निवडणुकांसाठी लाभदायक ठरणारी आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती प्रतीज्ञा पत्राच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय मतदारांसाठी जनजागृती करणारा आहे. गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणून लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राजकीय पक्ष अथवा आघाड्या उमेदवारी देताना वेगळे निकष लावते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा राजकारणात सहजतेने प्रवेश होते. मात्र आयोगाने राबविलेली ही संकल्पना निश्चित बदल करणारी ठरेल. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कोण उमेदवार रिंगणात हे स्पष्ट झाले आहे. गडगंज घरातील व्यक्तींचेही राजकारणाच्या दिशेने पावले पडू लागली आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रतीज्ञा पत्रात जाहीर केलेल्या संपत्तीची विवरणपत्रे पाहिले तर स्थावर व जंगल मालमत्तेबाबत अनेक बाबी स्पष्ट होतील. सदृढ लोकशाहीसाठी चांगल्या प्रतिमेच्या उमेदवार असणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेला उमेदवार नको, असे अभिप्रेत आहे. मात्र अमूक पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसरा पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांना उमेदवारी बहाल करतात, असे चित्र आहे. ही बाब समाजसाठी घातक ठरणारी आहे.