शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

नरभक्षक वाघ मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:24 PM

तालुक्यातील अंजनसिंगी व मंगरूळ दस्तगीर येथील दोघांना ठार करणाऱ्या वाघाचा धुमाकूळ कायम आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयाशेजारीच एका म्हशीला त्याने ठार केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. दरम्यान, केवळ काठ्या हाती असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या भरवशावर वाघ जेरबंद होणार का, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देपुन्हा ठार केली म्हैस : काठ्या आपटून होणार का जेरबंद; ग्रामस्थांचा सवाल

मोहन राऊत/राजाभाऊ मनोहरे।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील अंजनसिंगी व मंगरूळ दस्तगीर येथील दोघांना ठार करणाऱ्या वाघाचा धुमाकूळ कायम आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयाशेजारीच एका म्हशीला त्याने ठार केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. दरम्यान, केवळ काठ्या हाती असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या भरवशावर वाघ जेरबंद होणार का, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत.तब्बल २२० किलोमीटरचे अंतर पार करीत चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या या वाघाने शुक्रवारी मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर व सोमवारी अंजनसिंंगीच्या मोरेश्वर वाळके यांना ठार करून त्यांचे मांस खाल्ले. वनविभागाने सापळ्यासाठी ठेवलेल्या एका म्हशीसह जर्सी कालवडीचाही वाघाने समाचार घेतला. मंगळवारी पुन्हा रात्रीच्या सुमारास पिंजऱ्याच्या कडेला बांधलेली म्हैस ठार केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची भीती कायम आहे. तिवसा, धामणगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये शेतात कुणीही जाऊ नये, असे महसूल व वनविभागाने बजावले आहे.पिंजऱ्यापासून वाघ होतोय बेपत्तावाघाच्या दहशतीमुळे अनेक रात्री ग्रामस्थांनी जागून काढल्या. मात्र, अद्याप वाघ जेरबंद झालेला नाही. नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असले तरी बुधवारी त्याने खाल्लेली म्हैस ही पिंजऱ्याच्या बाजूला बांधलेली होती. त्यामुळे नियोजन चुकत आहे का, याबाबत वनविभागाने विचार करण्याची वेळ आली आहे.काठीच्या आधारे वाघाचा बंदोबस्त?अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील दीडशे वनकर्मचाऱ्यांचा ताफा हा वाघ शोधण्याकरिता लावण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या हाती काठी आहे. ते काठीच्या आधारे वाघाचा बंदोबस्त करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.‘डायरेक्ट किलिंग’ची देशातील पहिली घटनामंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर यांचे सर्व शरीर वाघाने कुरतडले. एक हात व मानेचा पूर्ण भाग बेपत्ता आहे, तर अंजनसिंगी येथील मोरेश्वर वाळके यांचे यकृत, हृदय, फुफ्फुसासह पोट व छातीचा सर्व भाग, गुप्तांग, मांडीचा पूर्ण भाग फस्त केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे व आशिष सालनकर यांनी शवविच्छेदन केले. तो वाघ साडेतीन वर्षाचा असल्याचे पुढे येत आहे. अशाप्रकारे वाघाने माणूस खाल्ल्याची ही पहिली घटना असल्याचे बोलले जाते.ढाकूलगाव शिवारात विष्ठा अन् पगमार्कढाकूलगाव शिवारातील विदर्भ नदीपात्राशेजारी असलेल्या पाण्याच्या डबक्यावर नरभक्षक वाघाचे पगमार्क मिळाले. वरूडचे वनपाल भारतभूषण अळसपुरे यांच्या चमूने त्याची नोंद घेतली. प्रेमानंद म्हात्रे यांच्या शेतात त्याची विष्ठा मिळाली. त्यात हाडाचे तुकडे होते. गव्हा फरकाडे येथील सरपंच दुर्योधन राघोर्ते, ढाकूलगावचे पोलीस पाटील महेश म्हात्रे यांनी वनअधिकाºयांना घटनास्थळ दाखविले. वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी सदर विष्ठा जप्त करून तपासणीसाठी पाठविली. अंजनसिंगी व ढाकूलगाव शिवारात मिळालेले पगमार्क एकच आहेत का, याची तपासणी वनविभाग करीत आहे.सात गावांमध्ये दवंडीनरभक्षक वाघाची दहशत असल्याने शेतात कुणीही जाऊ नये, जनावरे शेतात नेऊ नये म्हणून दररोज ढाकूलगाव, अशोकनगर, गव्हा फरकाडे, गव्हा निपाणी, गुंजी, अंजनवती, पिंपळखुटा या गावांमध्ये सकाळी ईश्वर काळे हे दवंडी देऊन जनजागृती करीत आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये वनविभागाने बोर्डवर नोटीस लावली आहे.तिवसा तालुक्यातील आलवाडा, मिर्झापूर, दुर्गवाडा, कुºहा, कौंडण्यपूर, बोर्डा तसेच धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी, पिंपळखुटा, गव्हा निपाणी, गव्हा फरकाडे, ढाकूलगाव, चिंचपूर येथील जिल्हा परिषद व खासगी शाळा-महाविद्यालये अघोषित बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.- स्नेहल कनिचेउपविभागीय अधिकारी