अमरावती - वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर या गावाजवळ अमरावतीहून नागपूरकडे जात असलेल्या एका कारचे नियंत्रण सुटल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकसह प्रवासी ठार झाल्याची घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. (Car accident on Amravati-Nagpur highway, three died on the spot)तळेगांव श्यामजीपंतच्या चिस्तुर गावाजवळ एका MH30 P 3214 क्रमांकाची कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे जागीच ठार झाले, तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे. मृतांमध्ये अमित गोयते (32) रा.बडनेरा, शुभम गारोडे (25, रा.अमरावती), आशिष माटे रा. राजुरा जि. अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले असून शुभम भोयर हा सुखरूप बचावला आहे, या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे ,तर एकाचा मृतदेह झाडावर अडकला होता. दुसरा वानातत अडकला होता. तिसरा मृतदेह बाजूला पडून होता.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात आले आहे. कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे,श्याम गहाट,राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर,विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
कारचे नियंत्रण सुटून भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, एकाचा मृतदेह झाडावर, दुसरा गाडीत तर तिसरा नालीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 9:51 AM