संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड : अंजनगाव बारी मार्गावरील घटनाबडनेरा : भरधाव कारने एका दुचाकीस्वारास चिरडल्याने एका १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सुपर एक्स्प्रेस हायवेवरील मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर गुरुवारी सकाळी १0 वाजता घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. त्यामुळे घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शेख समीर शेख हबीब (१५) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल अजीज अब्दुल समीर (३६) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. ते एमएच २७ एम ५७५ क्रमांकाच्या दुचाकीने अंजनगाव बारी येथून जात होते. दरम्यान एमएच १५ ईबी ६५४३ या ऑडी या चारचाकी वाहनाने नागपूरकडे जाताना मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यासमोर गुरुवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात १५ वर्षांचा शेख समीर शेख हबीबी जागीच ठार झाला. अब्दुल अजीज याला गंभीर अवस्थेत उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ऑडी वाहनाची तोडफोड केली. दरम्यान तणावसदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. दरम्यान मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बडनेर्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले होते. सदर अपघातातील चालक पदमेश्वर युवराज पाटील (२५ रा. नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीस्वार अब्दुल अजीज हा व मृत शेखर समीर कामकाजानिमित्त बडनेर्याकडे येत होते. बडनेरा पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरची चौफुली अपघाताचे प्रवणस्थळ झाले आहे. येथूनच अंजनगाव व पलीकडच्या गावासाठी मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे याच परिसरात ३ ते ४ महाविद्यालये आहेत. या ठिकाणच्या अपघतावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. संतप्त जमावाने ऑडी वाहनाची तोडफोड करताना चालकासदेखील मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे घटनास्थळी सर्वप्रथम पोहचणार्या बडनेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी चंदेल व भागडकर यांनादेखील धक्काबुक्कीचा सामना करावा लागला, असे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले.
कारने दुचाकीस्वारास चिरडले
By admin | Published: May 29, 2014 11:29 PM