चिखलदरा : परतवाडा येथून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा घटांगमार्गे एका कारमधून नेत असलेला २.३४ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. चिखलदरा पोलिसांनी येथील आयटीआयपुढे शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली. प्रदीप शिवहरे (५४, रा. खामला मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
येथील आयटीआयपुढे पोलिसांनी एमएच २७ एसी ७३१८ क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता, त्यात अवैधरीत्या देशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, शिपाई आशिष वरघड, संदीप देवकते, सहकारी करीत आहेत.