शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

विमा कंपन्यांचा वाहनधारकांच्या खिशावर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 4:37 PM

शासनाने दुचाकीला पाच वर्षे, तर चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा विमा अनिवार्य केला आहे.

गणेश वासनिक  

अमरावती -  शासनाने दुचाकीला पाच वर्षे, तर चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा विमा अनिवार्य केला आहे. एवढेच नव्हे तर विम्याचे वार्षिक प्रीमियम दुप्पट केले आहे. आता प्रादेशिक परिवहन अधिकारी नव्या निकषानुसार विम्याची खात्री केल्यानंतरच वाहनांची नोंदणी करीत आहेत. १ सप्टेंबर २०१८ पासून केंद्र सरकारच्या या नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. मात्र, मोठी रक्कम एकाच वेळी जात असल्याने वाहनधारकांच्या खिशाला ताण पडत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या जुन्या नियमानुसार यापूर्वी कोणत्याही प्रकारातील वाहनांसाठी एक वर्षांचा विमा काढला जात होता. काही वाहनधारक त्रयस्थ (थर्ड पार्टी) विमा  काढायचे. मात्र, केंद्र सरकारने वाहनांकरिता नवी विमा प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीच्या अंमलबजवाणीस राज्यात प्रारंभ झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात १ सप्टेंबरपासून नव्याने नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा असल्याबाबतची पडताळणी केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आरटीओत एकूण २१ प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. केंद्र सरकारच्या निकषानुसार त्यांचा विमा नसल्यास त्या वाहनाची ऑनलाईन नोंदणी रद्द करण्यात येत आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांचे या नव्या निर्णयामुळे ‘बल्ले बल्ले’ झाले आहे. देशभरात विमा क्षेत्रात सुमारे ६० कंपन्या कार्यरत असल्याची माहिती आहे. वाहनांचा विमा काढताना प्रीमियमची रक्कम आणि कालमर्यादेत वाढ झाली आहे. यापूर्वी प्रतिवाहन वर्षाकाठी ८०० ते ९०० रुपये विमा रक्कम भरावी लागत होती. मात्र, आता १७०० ते १८०० रुपये विम्याची रक्कम भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने वाहनधारकांच्या भवितव्याचा विचार करून विमा कालावधीत वाढ केली असली तरी रक्कम दुप्पट केल्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटू लागल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

देशभरात बहुतांश अपघातात वाहनांचा विमा नसल्यामुळे यातील मृत तसेच जखमींना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांचा विमा कालावधी निश्चित करून नागरिकांच्या जिवांचे रक्षण करण्याबाबत केंद्र सरकारला आदेशित केले. परिणामी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने नव्या वाहनांसाठी विमा संरक्षण कवच म्हणून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी विमा कालावधी निश्चित केला आहे. 

वाहनांच्या विम्याबाबत जुन्या पद्धतीला फाटा बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोणत्याही प्रकारचे वाहन असल्यास आता नव्या निकषानुसार विमा भरल्यानंतरच ऑनलाईन नोंदणी होईल. १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. - आर.टी. गित्ते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीcarकार