शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

सावधान! चेहऱ्यावर मास्क नसेल तर होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित गटनेते, पक्षनेता, विरोधीपक्षनेत्यांच्या बैठकीत आयुक्त प्रशांत रोडे यांनी महानगराची सद्य:स्थिती विशद केली. नागरिकांनी आरोग्य तपासणी पथकाला सहकार्य करणे अपेक्षित असून, त्यानुसार जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. हॉयरिक्स भागात आरोग्य उपाययोजनांची कामे अधिक गतीमान सुरू आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या बैठकीत निर्णय : कोविड-१९ चे सर्वाधिकार महापालिका प्रशासनाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रशासनाने युद्धस्तरावर प्रयत्न चालविले आहे. असे असताना रूग्णसंख्येतही झपाट्याने वाढ असल्यामुळे आता नागरिकांनी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित गटनेते, पक्षनेता, विरोधीपक्षनेत्यांच्या बैठकीत आयुक्त प्रशांत रोडे यांनी महानगराची सद्य:स्थिती विशद केली. नागरिकांनी आरोग्य तपासणी पथकाला सहकार्य करणे अपेक्षित असून, त्यानुसार जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. हॉयरिक्स भागात आरोग्य उपाययोजनांची कामे अधिक गतीमान सुरू आहे. यात वेगाने वाढ करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा असून, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा सूचना यावेळी महापौर चेतन गावंडे यांनी प्रशासनाला केल्यात. कोरोनाच्या धर्तीवर सफाई कामगार, कंत्राटदार आणि त्यांचे सफाई कर्मचारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी उत्तम कामगिरी करीत असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. यावेळी कोविड १९ या आजाराबाबत सविस्तर मंथन झाले.दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून, प्रत्येकाने या बाबीची नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्क न वापरणाºया नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आयुक्त प्रशांत रोडे, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अब्दुल नाजीम, गटनेता भारत चौधरी, गटनेता दिनेश बूब, नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद चिमोेटे, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय आदी उपस्थित होते.अस्थायी दवाखाने सुरू होणारकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात अस्थायी स्वरूपाचे दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. कोविड १९ यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचे अधिकार पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. कम्युनिटी ट्रॉन्समिशन थांबविण्यासाठी ठिकठिकाणी अस्थायी दवाखाने हे मोलाचे ठरणारे आहेत. सूचना, नियमांचे पालन न करणाºयांवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलावीत असे निर्देश बैठकीत देण्यात आले.संचारबंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल कराकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्यास उल्लंघन करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, पोलिसांची मदत घ्यावी, असे बैठकीतून स्पष्ट करण्यात आले. कोरोना आजाराबाबत दक्षतेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार युनीट आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर गावंडे यांनी केले आहे.‘सोशल डिस्टन्सिंग’साठी कठोर भूमिका घ्याशहरात रेशन दुकान, भाजीबाजार, हातगाडी, किराणा दुकान, बॅक आदी ठिकाणी नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याची बाब महापौर, पदाधिकाºयांनी व्यक्त केली. मास्क नसल्यास हातगाडी फिरणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्या. काहीही झाले तरी ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.गरजूंच्या जेवणांचे नियोजन कराशहरात मोठ्या प्रमाणात गरजू, निराधार व्यक्ती आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत अशा व्यक्तिंच्या जेवणांचे नियोजन करण्यात यावे. त्याकरिता आयुक्तांनी समन्वयकासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे पदाधिकाºयांनी म्हणाले. अधिकाºयांनी झुमअ‍ॅपद्वारे बैठकी घेण्याचा निर्णय झाला. बेघर निवाऱ्यामधील भोजन व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी पुढाकार घ्यावा, तशी नोंदणी करावी, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस