चमू जरुडात : आॅनलाईन प्रश्नपत्रिका वितरणावर प्रश्नचिन्ह लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार पारदर्शकपणे असावा, यासाठी ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कारभार सुरू केला आहे. मात्र उन्हाळी परीक्षेचा ‘क्रॉईम लॉ’ या विषयाचा ९ मे रोजी झालेला पेपर तासभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर टाकल्याप्रकरणी विद्यापीठाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठाची चमू दाखल झाली आहे.कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार ‘क्रॉईम लॉ’ विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. त्यानुसार परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते यांच्या अध्यक्षतेखाली चमू व्हॉट्सअपवर ‘क्राईम ला’चा पेपर तासभरापूर्वी व्हायरल झाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोहोचली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचारकाने हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याने विद्यापीठाच्या ग्रुपवर ही माहिती धडकली आहे. पेपर सुरू होण्याआधीच विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हायरल होत असेल तर विद्यापीठाचा गोपनीय विभाग काय करतो, हा सवाल उपस्थित होतो. परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पेपर कसा, कोणी बाहेर काढायचा ही नियमावली ठरविली आहे. आॅनलाईन पेपर काढताना त्या ठिकाणी कोण अधिकारी असावेत, हेदेखील मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित आहे. असे असताना ९ मे रोजी जरुड येथे कला, वाणिज्य महाविद्यालयात ‘क्रॉईम लॉ’चा पेपर काढताना तेथे प्रयोगशाळा परिचारक काय करीत होता, हा संशोधानाचा विषय आहे. हा पेपर ‘एसजीबीयू’ समर एक्झाम या विद्यापीठाच्या व्हॉट्सअपवर गृ्रपवर पोहचविला. या ग्रुपवर विद्यापीठाचे सर्व परीक्षा कें द्रावरील केंद्राधिकारी समाविष्ट आहे. परीक्षा केंद्रावर वितरित केलेल्या आॅनलाईन प्रश्नपत्रिका अर्धातासापूर्वी पोहचविण्यात आल्यात. त्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून ती विद्यार्थ्यांना केंद्रावर मिळणे अपेक्षित आहे. परंतु जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातून एक तास १० मिनिटांपूर्वी हा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर सेलकडे तपास जाण्याची शक्यताजरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यलयातील प्रयोगशाळा परिचारकाने ‘क्रॉईम लॉ’ चा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल केल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण पुढील तपासासाठी सायबर सेलकडे देणार असल्याची माहिती आहे. पेपर तासभरांपूर्वी कशासाठी व्हॉटस्अपवर व्हायरल झाला, याचा शोध घेणे हे विद्यापीठ प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे.विधी अभ्यासक्रमाचा ‘क्रॉईम’ या विषयाचा पेपर व्हॉट्अपवर तासभरापूर्वी पाठविल्याप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात चमू पोहचली आहे. यात वस्तुनिष्ठ चौकशी करुन संबंधितांवर कायदेशिर कारवाई होईल.- जयंत वडते, संचालक, परीक्षा मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
‘क्रॉईम लॉ’चा पेपर फुटल्याप्रकरणी चौकशी
By admin | Published: May 13, 2017 12:08 AM