लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वीज बिलांचा नियमित भरणा करण्याची तयारी असतानाही केंद्र नसल्याने नियमित वीज बिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अंजनगाव, मंगरूळ दस्तगीर आणि राजुराबाजार या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सुरुवातीला विदर्भातील २८ गावांसह राज्यातील ५० गावांतून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्ती निश्चित केली जाणार आहे.साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीज बिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या गावांमधील साप्ताहिक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून, या फिरत्या विज अर्ज भरणा केंद्रामध्ये इंटरनेट, संगणक, प्रिंटर आदींची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात महावितरणच्या कर्मचाºयांसोबतच जनतेला याबाबत माहिती मिळण्यासाठी उद्घोेषणा करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. दुर्मीळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावांसोबतच वीज भरणा केंद्राची सोय उपलब्ध नसलेल्या गावांचीही या सुविधेसाठी निवड करण्यात आली आहे.दाट लोकवस्ती; मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्रे असलेल्या गावांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वीज बिल भरणा केंद्र नसलेल्या गावांचाही यात विचार करण्यात येत आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावांतूनही ही मोबाइल व्हॅन फिरविली जाणार आहे.प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनतरप्रतिसादानंतर सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत विचार केला जाणार असून, प्रायोगिक तत्त्वावर ही योजना अकोला जिल्ह्यातील कापशी आणि अडेगाव, बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा, हिरडाव आणि आसलगाव, जामोद, वाशिम जिल्ह्यातील मोप, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, मंगरूळ दस्तगीर येथे राबविली जाईल.
वीज बिलासाठी कॅश कलेक्शन मोबाईल व्हॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:05 PM
वीज बिलांचा नियमित भरणा करण्याची तयारी असतानाही केंद्र नसल्याने नियमित वीज बिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देतीन गावात प्रयोग : महावितरणचा उपक्रम