शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

करचोरी रोखण्यासाठी कॅशलेश व्यवहार आवश्यक

By admin | Published: April 16, 2017 12:06 AM

दैनंदिन आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेश प्रणालीचा अवलंब करून ....

पालकमंत्री : डिजिधन मेळाव्याचे उद्घाटन, विजेत्यांना बक्षीस वितरणअमरावती : दैनंदिन आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेश प्रणालीचा अवलंब करून सर्व आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरिंग प्रणालीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शंभर दिवसांच्या डिजिधन मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री रणवीर, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, लिड बँकेचे व्यवस्थापक रामटेके, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नागपूर येथे भीम आधार अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. विविध अ‍ॅप्लीकेशनची माहिती व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घोषवाक्य, पोस्टर, कविता-स्लोगन असे गट ठरविण्यात आले होते. आज आयोजित कार्यक्रमात सदर गटातील प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक गौरविण्यात आले, असेही परदेशी यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सर्व व्यवहार डिजिटलमध्ये रुपांतर होऊन त्या आॅनलाईन पद्धतीने पूर्ण होतात. ई गर्व्हनन्स, ई पेमेंट यासारखे अ‍ॅप्लीकेशन हाताळताना करवयाच्या प्रक्रियेचा अवलंब कशाप्रकारे केला जातो, यासंबंधी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या भीम आधार या अ‍ॅपचा सर्वांनी उपयोग करावा. भीम अ‍ॅप मोबाईलमध्ये अपलोड करावे, असे आवाहन रणवीर यांनी केले. डिजिधन मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविद्यालय व शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकगण, अधिकारीवर्ग व नागरिक उपस्थित होते.