१११ जणांची नागपूर येथे होणार शस्त्रक्रिया
मोर्शी : विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि डॉ.महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ३५० रुग्णांची तपासणी झाली. येथील शिवाजी कन्या शाळेत हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात तपासणी केलेल्या १११ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान करण्यात आले. त्यांना २० ऑगस्ट रोजी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. तेथे मोफत अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्यात येणार असल्याचे आ. भुयार यांनी सांगितले. आमदारांसह नगराध्यक्षा मेघना मडघे, माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रूपेश वाळके, शहर अध्यक्ष तमीज, रायुकाँ शहर अध्यक्ष अंकुश घारड, बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हितेश साबळे, रूपेश मेश्राम, नगरसेविका विद्या ढवळे, प्रतिभा महल्ले, दीक्षा गवई, सुनीता कोहळे, मयूर राऊत, स्नेहा जाने, विनोद ढवळे, शेरखाँ, दिलीप गवई, आनंद तायडे, देवेंद्र खांडेकर, पंकज राऊत, अमर नागले, बंटी नागले, राहुले धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.