शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

मांज्यामुळे दोन पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:32 PM

नॉयलॉन मांज्यावर बंदी असताना शहरात सर्रास याचा उपयोग करून पतंगी उडताना दिसत आहेत.

ठळक मुद्देस्थलांतरित पक्ष्यांनाही फटका : दोन महिन्यांत सात पक्ष्यांसाठी रेस्क्यू

आॅनलाईन लोकमतअमरावती : नॉयलॉन मांज्यावर बंदी असताना शहरात सर्रास याचा उपयोग करून पतंगी उडताना दिसत आहेत. नॉयलॉन मांज्यामुळे हवेत उडणारे किंवा झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचे जीव धोक्यात आले आहे. दोन महिन्यांत पक्षिप्रेमींनी सात पक्ष्यांसाठी रेस्क्यू आॅपरेशन चालविले. त्यापैकी पाच पक्ष्यांचे जीव वाचविण्यात पक्षिपे्रमींना यश आले, तर दोन पक्षी दगावले.पतंग उडविण्याचा आनंद पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दरवर्षी पतंगीच्या धाग्यात अडकून २० ते २५ पक्षी मरतात, तर शेकडो जखमी होतात. मकर संक्रांतीच्या पर्वावर सर्वाधिक पतंग उडविल्या जातात. पेचा लावण्यासाठी मांज्याला अधिक धारदार बनविण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये पतंगीसाठी चायना किंवा नॉयलॉन मांजा सर्रास वापरला जातो. मात्र, या मांज्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. या मांज्यामुळे सर्वाधिक नुकसान पक्ष्यांचे झाले आहे. त्यामुळे नॉयलॉन मांज्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा छुप्या मार्गाने नॉयलॉन मांज्याची विक्री करून व्यापारी वर्ग सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे नॉयलॉन मांज्याची खरेदी करू नका, असे आवाहन पक्षिबचावाचा नारा देणाºया वसा, नेचर फ्रेन्ड्स व मधुबन यांनी केला आहे. शहरात कोठेही जखमी किंवा मांज्यात अडकलेले पक्षी आढळून आल्यास पक्षिप्रेमी गणेश अकर्ते, अभि दाणी व शुभम सायंके यांच्या ९५९५३६०७५६, ९५७९१११०१७, ९९७०३५२५२३ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.रेस्क्यू टीमद्वारे २४ तास सेवावसाचे पक्षिमित्र गणेश अकर्ते यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीमचे अभिजित दाणी, भूषण सायंके, अक्षय चांबटकर, रितेश हंगरे, मुकेश वाघमारे, तुषार वानखडे, अभिषेक पुल्लजवार, रोहित रेवाळकर, सूरज लव्हाळे, अंकुश खरड, आशिष गुप्ता, ठकसेन इंगोले, यश सोनारे, अनिकेत देशमुख आणि शुभम सायंके हे पक्षी वाचविण्यासाठी २४ तास सेवा देत आहेत. जखमी पक्षांच्या उपचारासाठी रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. या पक्ष्यांना योग्य व वेळीच उपचार मिळावेत, यासाठी यादव तरटे, जयंत वडतकर, छायाचित्रकार मनोज बिंड निरीक्षक म्हणून काम पाहत आहे.