फोटो - पोहरा बंदी ०२ एस
पोहरा बंदी : चिरोडी वनवर्तुळातील २५ हेक्टरच्या रोपवनात चराई करीत असलेली सात गुरे वनविभागाने ताब्यात घेतली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. वनकर्मचाऱी कारवाईकरिता धडकताच गुराखी काही गुरे पळवून नेण्यात यशस्वी झाला. जप्त गुरे कारला येथील काेंडवाड्यात बंदिस्त करण्यात आली. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, वनरक्षक अतुल धस्कट, प्रमोद राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.