लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार/शिरजगाव कसबा : गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक बहिरम आरटीओच्या सहकार्याने शिरजगाव पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केला. यामध्ये सुमारे ७५ गायी व बैल होते. दोन दिवसांपूर्वीच शिरजगावात गोमांस विक्रीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.शिरजगाव पोलीस ठाण्यापासून नऊ किमी अंतरावर बहिरम येथे नवीन आरटीओ चेकपोस्ट उभारला आहे. शनिवारी रात्री जनावरांचा ट्रक मध्य प्रदेशाकडून अमरावतीकडे येत होता; मात्र चेक पोस्ट दिसताच चालकाने ट्रक थांबविला आणि सहकाºयासह पोबारा केला.अखेर आरटीओ कर्मचारी ट्रकजवळ पोहोचले आणि पाहणी केली असता, त्यामध्ये गाई व बैल आढळले. या माहितीच्या आधारे एमपी ०९ एचएच ७०७७ क्रमांकाचा ट्रक शिरजगाव पोलिसांनी जप्त केले.जनावरे रासेगावच्या गोशाळेतचांदूरबाजार/शिरजगाव कसबा : ट्रकमध्ये दोन माळे तयार करून सुमारे ७५ जनावरे निदर्यतेने कोंडण्यात आली होती. रासेगाव येथील गोशाळेत ही जनावरे पाठविण्यात आली आहेत. जनावरे व ट्रक असा एकूण १८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ट्रकमालकाचा शोध घेतला जात असून, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आल्याची माहिती शिरजगाव पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी केली.
गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:21 PM
गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक बहिरम आरटीओच्या सहकार्याने शिरजगाव पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केला. यामध्ये सुमारे ७५ गायी व बैल होते.
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : ७५ जनावरांची सुटका