अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरीगेट ठाणे हद्दीतील लालखडी येथील रेल्वे ट्रॅकजवळ जुगाराचे साहित्य व दोन मोबाईलसह १४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २८ मे रोजी करण्यात आली. या प्रकरणी आरोपी श्रीकांत भीमराव काळबांडे (३०, रा. जयसियाराम नगर), शेख आबीद शेख अजीम (रा. लालखडी अमरावती) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेशकुमार मुंडे यांनी केली.
---------------------------------------------------
पार्डी येथे जुगार पकडला
बडनेरा : पोलिसांनी नजीकच्या पार्डी येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २८ मे रोजी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी संजय नारायणराव ठेंबरे (४२), सुरेंद्र गिरीवर बनसोड (४०, दोन्ही रा. पार्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहेत.
-------------------------------------------------------------------
रोहणखेड येथे जुगार पकडला
अमरावती : नांदगावपेठ पोलिसांनी येथील रोहणखेड येथे कारवाई करून जुगार साहित्यासह ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आरोपी प्रसाद छत्रपती रायबोले (१९, रा. रोहणखेडा), गोकुल विश्वनाथ नांदण(२१, रा. नांदुरा) , मिथून ठाकूर ( रा. माहुली जहागीर ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-------------------------------------------------------