चांदूरबाजार : अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड रुग्णांचा भार कमी व्हावा, यादृष्टीने चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे कोविड उपचार सेंटर द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
येथे काेविड सेंटर झाल्यास ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना जावे लागणार नाही. तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी. जिल्हा व तालुक्यावरील रुग्णांचा भार कमी करण्याच्या दृष्टीने व संभाव्य लाटेची शक्यता, लहान मुलांकरिता संभाव्य संक्रमणामुळे बेड व ऑक्सिजन व्हेंटिलेटर्ससह याठिकाणी कोविड उपचार सेंटर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.