लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी अडीच वाजता सीबीएसई संकेत स्थळावर जाहीर झाला. शहरातील आठ शाळांमधून स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता ज्योतिकुमार कनोजी हिने सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चमक दाखवली.शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, स्कॉलर्स कॉन्व्हेंट, इंडो पब्लिक स्कूल, महर्षी पब्लिक स्कूल, पी.आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल, पोदार स्कूल, अभ्यासा इंटरनॅशनल, विश्वभारती पब्लिक स्कूल अशा आठ सीबीएसई शाळा आहेत. या शाळांमध्ये दहावीची परीक्षा ३ मार्च रोजी प्रारंभ झाली आणि २५ मार्च रोजी संपली. ६ मे रोजी संकेतस्थळावर आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर संकेत स्थळावर निकाल पाहण्यासाठी शाळांसह विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.संकेतस्थळ हँग न होता निकाल सुरळीत बघता आला. शहरातील सीबीएसई शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.असा आहे शाळानिहाय निकालशहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता कनोजी हिने ९८ टक्के गुण पटावित सीबीएसई परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. मानव काळमेघ याने ९७.४ टक्के, पार्थ देशमुख ९७.४, रजत धुमाळ ९७.४, पीयूष गावंडे ९६.२, शरयू अडकणे ९६.२, तर कुशाल मेहता याने ९६ टक्के गुण पटकावले.स्कॉलर्स कॉन्व्हेंटचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अंजली राठी हिने ९६.८ टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. कृष्णा सोमाणी याने ९४.८ टक्के, सिद्धी लिखमानी ९४.४, शंतनू मेटी ९२ टक्के, भागश्री टेकाडे ८८.८ टक्के, तर अंकित गावंडे याने ८७.६ टक्के गुण मिळविले आहेत.विश्वभारती पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. कौस्तुभ वाघमारे याने ९२.८ टक्के गुण मिळवित शाळेतून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला. अथर्व राणे याने ९०.८ टक्के, तर साकेत वावरे याने ९० टक्के गुण मिळवले. शाळेतून २० विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.महर्षी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यात दिग्विजय वाघ, अनुराधा चोपडे, धर्मेश पंचारिया, गुंजन भुगूल, मोनल बारसे, इरम अली, तनिश आचार्य, प्रेम वंजारी, अदिरी अंबाडकर, वीर गडलिंग, अर्थव जाधव, आकांक्षा भगत यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे.एडिफाय स्कूलनेही निकालात बाजी मारली. यात अर्पित बिजवे याने ९२.६ टक्के, तनिष्का टाकसाळे ९२ तर आदित्य काळे याने ९१.२ टक्के गुण मिळवले. शाळेचे २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अभ्यासा इंग्लिश स्कूलचे ३९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. शाळेचा १०० टक्के निकाल लागला. तन्वी अनिल देशमुख (९७), निखिल धनंजय खाडे (९५), श्रावणी अमित धांडे (९४), प्रीती राजकुमार कटिया (९३), सई हेमंत लांडगे (९३), सुमीत अरविंद धस्कट (९३), आयुष दिनेश किरक्टे (९३), वेदांत पुंडलिक वानखडे (९३), अनन्या सुनील लोंढे (९३), समृद्धी गोपाल लढ्ढा (९३), पार्थ किशोर इंगळे (९२), सम्यक रवींद्र तिखाडे (९०), हर्षल श्रवण पवार (९०) यांनी गुणवंतांच्या यादी स्थान मिळविले.पी.आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला ७१ विद्यार्थी बसले होते. यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रशब्दी आठवले हिने ९६.२० टक्के, निधी गिरी ९६ टक्के, ईशान जयस्वाल ९५.४, इशा पालेकर ९४.६, यश कडू ९४.४, आकांक्षा फुटाणे ९४.४, यश सारडा ९४ टक्के, ऋषभ सारडा ९३.६, रिया शहा ९३.४, समृद्धी खोडे ९३.४, अनुश्री घटाले ९३ टक्के, सेजल फुसे ९०.४, निकिता शिरस्कार हिने ८९.४ टक्के गुण मिळवले.पोदार इंटरनॅशनल स्कूलने निकालात बाजी मारली. ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क््यांपेक्षा जास्त गुण मिळविले. पहिल्या दहामध्ये आर्यन खेडकर (९७ टक्के), आदर्श चौधरी (९७), प्रसाद केळकर (९६.६), सृजन संगई (९६.४), कार्तिक कुंजेकर (९५.८), अथर्व गावंडे (९५.८), निकिता हिंडोचा (९५.४), यश दोशी (९५.२), छवी बजाज (९५), आशय ठाकरे (९४.८), प्रशील टिपरे (९४.८) आहेत.अंकिताची आयआयटीमध्ये जाण्याची मनीषासीबीएसई दहावीच्या परीक्षेत शहरातील शाळांमधून अव्वल आलेल्या अंकिता कनोजी हिला आयआयटीतून इंजिनीअरिंग करायचे आहे, असे तिचे वडील ज्योतीकुमार कनोजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोमवारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला तेव्हा ती हैद्राबाद येथे कॅम्पसमध्ये होती. ज्योतीकुमार कनोजी यांनी लष्करात १९८० ते १९९७ या काळात सेवा दिली. आई मीरा या गृहिणी आहेत. अंकिताला अभियांत्रिकीच्या माध्यमातून देशसेवा करायची आहे.
सीबीएसई दहावीत ‘अंकिता’ चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:39 PM
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी अडीच वाजता सीबीएसई संकेत स्थळावर जाहीर झाला. शहरातील आठ शाळांमधून स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता ज्योतिकुमार कनोजी हिने सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चमक दाखवली.
ठळक मुद्देघवघवीत यश : आठ शाळांचा निकाल १०० टक्के, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधाण