शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

आयुक्तांच्या दालनातून सीसीटीव्ही फुटेज गहाळ ?

By admin | Published: March 03, 2016 12:19 AM

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज गहाळ केल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

अजब-गजब प्रकार : फेब्रुवारी महिन्याचे फुटेज गेलेत कुठे ?अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज गहाळ केल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महिनाभराचे फुटेज अचानक गेले कुठे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत आयुक्त गुडेवार यांच्यावर सत्तापक्ष आणि विरोधकांनी आरोपांचे रान उठविले आहे. अशातच मागील आठवड्यात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या प्रकल्प अधिकारी वंदना गुल्हाने यांनी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार नोंदवून आयुक्तांना लक्ष्य केले आहे. आयुक्त गुडेवार यांची चहुबाजुने नाकाबंदी केली जात असताना त्यांच्या दालनातील अतिविशेष कक्षात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गहाळ झाल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. हे फुटेज कोणी, कशासाठी गहाळ केले? याबाबत तर्क लढविले जात असून यामागे बरेच राजकारण दडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त चंदन पाटील, विनायक औगड यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. भेटीगाठी, अभ्यागतांसोबत होणारा संवाद, मोर्चे, आंदोलकांच्या हालचाली टिपण्यासाठी ही व्यवस्था आहे. या सीसीटीव्हीचे कंट्रोल रुम आयुक्तांच्या ‘एन्टी’ कक्षात आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात आयुक्त, उपायुक्तांच्या दालनातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संवाद, चित्रिकरण गहाळ झाल्याची माहिती आहे. फुटेज गहाळ होण्यामागे दडलेले नेमके कारण शोधून काढण्याचे मोठे आव्हान आता आयुक्तांना पेलावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध नसल्याने हा प्रकार आयुक्तांच्या दालनातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आयुक्त, उपायुक्तांच्या दालनात फेब्रुवारी महिन्यात असे काय घडले की ज्यामुळे फुटेज गहाळ करण्यात आले?, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. गुडेवार हे ‘डेअर डॅशींग’ अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत. असे असताना त्यांच्या दालनातून सीसीटीव्हीचे फुटेज गहाळ होणे, ही बाब महापालिका प्रशासनासाठी धक्कादायक मानली जात आहे. (प्रतिनिधी)