शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

आदिवासी आश्रमशाळांची सीसीटीव्ही खरेदी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 7:31 PM

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ ५५२ शासकीय आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे.

गणेश वासनिकअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ ५५२ शासकीय आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिमाणी यापूर्वीची ई-निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे. आता केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट मार्केट प्लेस (गेम) पोर्टलमधून ते खरेदी करावे लागणार असल्याचे पत्र ‘ट्रायबल’ आयुक्तांनी पाठविले आहे. 

ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्प कार्यालयांच्या अधिनस्थ ५२२ शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा प्रस्तावित आह. त्याअनुषंगाने केंद्र सरकारचे विशेष सहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. अमरावती दोन कोटी, नागपूर पाच कोटी, नाशिक सात कोटी, तर ठाणे आठ कोटी असे एटीसी अंतर्गत अनुदान मिळाले. चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर आश्रमशाळांच्या मागणीनुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीची ई-निविदा राबविण्यात आली. मात्र, ई-निविदा उघडण्याआधी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यास मज्जाव केला. ई-निविदा न राबविता सीसीटीव्ही कॅमेरे ‘गेम’ पोर्टलमधून खरेदी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे अगोदरच सहा महिने रखडलेल्या या प्रक्रियेला पुन्हा ‘ब्रेक’ बसला आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी नव्याने प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात तरी आश्रमशाळांना सीसीटीव्ही कॅमेरे मिळणार की नाही, याबाबत शंका आहे.

सीसीटीव्ही आवश्यकचआदिवासी आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार, शिक्षक व कर्मचाºयांची गैरहजेरी, विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, वर्गखोल्यांची दयनीय अवस्था, आरोग्य सुविधेचा बोजवारा, संरक्षण कुंपणाचा अभाव, निवास व्यवस्थेत उणिवा, पायाभूत सुविधांचा अभाव आदींमुळे सीसीेटीव्ही कॅमेरे बसविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले जातील. अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत ८३ आश्रमशाळांसाठी दोन कोटींतून सीसीटीव्ही कॅमेºयांसह अन्य पूरक साहित्य खरेदी प्रस्तावित आहे. नव्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या ‘गेम’ पोर्टलवरून खरेदी करू.- गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती. 

टॅग्स :cctvसीसीटीव्ही