मनीष तसरे -अमरावती: आयुक्तलयातील पोलीस अंमलदार प्रविण आखरे यांनी स्वातत्र्य दिनाच्या दिवशी पोलीस जलतरण केंद्रात अकरा फूट पाण्याखाली तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बोरकर,सागर पाटील, व इतर कर्मचारी उपस्थित होते.प्रवीण आखरे हे जलतरण केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून काम पाहत आहे.त्यांनी या पाण्यावर तरंगत व पाण्याच्या आत राहून योगासने करून 'इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड' व 'एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड' आपल्या नावे केला आहे.त्यांच्या या कामगीरीमूळे अमरावती शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची शान वाढली आहे.प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत.
पाण्यात,अवकाशात अन् जमीनीवर देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 1:07 PM