लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाहतूक जलद करण्यासाठी निर्माण केलेले शहरातील सिमेंट रस्ते चक्क पार्किंग झोन बनल्याचे चित्र आहे. इर्विन ते बाबा कॉर्नर, राजकमल ते गांधी चौक व जयस्तंभ ते जवाहर गेट या तिन्ही सिमेंट रस्त्यांवर वाहने पार्क केली जात असल्यामुळे दररोज वाहतुकीच्या कोंडीचा सामना जनसामान्यांना करावा लागत आहे. रस्त्याचा व्यावसायिक वापर होत असतानाही वाहतूक पोलिसांसह महापालिका प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.सिमेंट रस्त्यांच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे अमरावतीकरांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. एकतर्फी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असून, ती जीवघेणी ठरत आहे. दररोज अपघाताला आमंत्रण मिळत आहे. त्यातच आता हे सिमेंट रस्ते चक्क पार्किंग झोन म्हणूनच उपयोगात आणले जात आहेत. या रस्त्यावर दररोज वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील इर्विन चौक ते बाबा कार्नर, इर्विन ते बाबा कॉर्नर, राजकमल ते गांधी चौक व जयस्तंभ ते जवाहर गेट येथील सिमेंट रस्त्यासह शहरातील अन्य ठिकाणच्या रस्त्यावर हीच स्थिती पाहायला मिळत आहे. याकडे वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दोन्ही विभागांचे व्यापारी वर्गाने अभय असल्याचे चित्र आहे.इर्विन ते बाबा कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचा विचकाइर्विन ते बाबा क ॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कार डेकोर प्रतिष्ठाने आहेत. येथे येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. या एकतर्फी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असतानाही अर्धाअधिक रस्त्याचा वापर हे व्यावसायिक करीत आहेत. याच रस्त्यावर वाहतूक शाखेचे मुख्य कार्यालय आहे, हे विशेष.सिमेंट रोडवर वाहनांचे पार्किंंग होत असेल, तर चौकशी करू. त्यानुसार पुढील कारवाई करता येईल.- रणजित देसाईसहायक पोलीस आयुक्तरस्त्याचा व्यावसायिक वापर होत असेल, तर पोलीस विभागाशी चर्चा करू. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- गणेश कुत्तरमारे,अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख
सिमेंट रस्ते बनले पार्किंग झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:29 AM
वाहतूक जलद करण्यासाठी निर्माण केलेले शहरातील सिमेंट रस्ते चक्क पार्किंग झोन बनल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्यांचा व्यावसायिक वापर