शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

आदिवासींच्या ‘उंची’ला केंद्राची ‘हा’, राज्याची ’ना’, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर आक्षेप

By गणेश वासनिक | Published: November 06, 2022 5:00 PM

आदिवासी तरूणांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने उंचीबाबत ५ सेमीची सूट दिली आहे. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उंचीबाबत सूट दिली जात नाही.

अमरावती : आदिवासी तरूणांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने उंचीबाबत ५ सेमीची सूट दिली आहे. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उंचीबाबत सूट दिली जात नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उत्तीर्णनंतर केंद्राचे वेगळे नियम आणि राज्याचे वेगळेनियम का? असा सवाल ट्रायबल फोरमने उपस्थित करीत यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने नियमावली लागू करावी,अशी मागणी केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशा विविध पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाते. या शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेत उंचीमध्ये आदिवासी तरुणांवर अन्याय होत असून उंचीत ५ सेंमी. ची सूट देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांचेकडे केली आहे. युपीएससीने सूट मात्र एमपीएससीकडून सक्ती आहे. त्यामुळे एकच उमेदवार उंचीतील फरकामुळे यूपीएससीत पात्र तर एमपीएससीत अपात्र ठरत आहे.

नैसर्गिकदृष्ट्या आदिवासींची उंची कमीच

आदिवासी समाजातील उमेदवार जिद्दीने, मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतात. परंतू नैसर्गिक द्रुष्ट्याच आदिवासींची उंची इतरापेक्षा कमी आहे. उंचीतील अवघ्या २/३ सेमीच्या फरकामुळे स्पर्धेतून बाद होतात. शिखरापर्यंत जाऊन परत येतात. अनेकदा प्रयत्न करुनही उमेदवारांमुळे नैराश्य येते. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आदिवासींना सूट

केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणा-या भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब च्या पदभरती साठी शारीरिक क्षमता चाचणीमथ्ये १६५ सेमी. उंची अनिवार्य केली आहे. पण यात आदिवासी पुरुष उमेदवारासाठी १६० सेमी. व महीला उमेदवारांसाठी १४५ सेमी. अशी दोघांनाही पात्रतेसाठी ५ सेमी. ची सूट दिलेली आहे. परंतू ही सूट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लक्षात आजपर्यंत आली नाही. 

६२ वर्षात आयोगावर प्रतिनिधित्व नाही

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५० अन्वये १ मे १९६० रोजी लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला. तेव्हापासून या घटनात्मक आयोगावर आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही.

संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या उमेदवार निवडीत अनुसूचित जमाती उमेदवारांच्या बाबतीत शारीरिकक्षमता चाचणीमध्ये उंचीत ५ से.मी.ची स्पष्ट तफावत आहे. आयोगाच्या परीक्षा चालू असून सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे. याविषयी कार्यवाही अपेक्षित आहे. - नरेश गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAmravatiअमरावती