लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप कर्जवाटपाचा वेग वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्या असतानासुद्धा दुर्लक्ष करणे सेंट्रल बँकेला चांगलेच महागात पडले. जिल्ह्याची लीड बँक असणाऱ्या या बँकेमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्व खाती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.यंदाच्या खरीप हंगामासाठी सेंट्रल बँकेला २३२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत आतापर्यंत केवळ ६ हजार ५५६ शेतकऱ्यांना ५३.२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या बँकेची जिल्हा कचेरीशी संबंधित सर्व खाती बंद करण्याचे निर्देश दिलेत. मागील महिन्यात याच मुद्द्यावरून स्टेट बँकेची जिल्हा कार्यालयातील पाच खाती बंद करण्यात आल्यानंतर आता ही नामुष्की सेंट्रल बँकेवर ओढावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना याबाबतच्या सूचना निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६ हजार ८७४ शेतकऱ्यांना ४६७.९० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे, ही २९ टक्केवारी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा सेंट्रल बँकेला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:03 PM
खरीप कर्जवाटपाचा वेग वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्या असतानासुद्धा दुर्लक्ष करणे सेंट्रल बँकेला चांगलेच महागात पडले. जिल्ह्याची लीड बँक असणाऱ्या या बँकेमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्व खाती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देजिल्हा कार्यालयाची खाते बंदचे आदेश