फोटो -
वरूड : देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. ५० दिवसांत ३५ वेळा दरवाढ झाली. पेट्रोल १०७ रुपये, तर डिझेल ९५ रुपये प्रतिलिटरवर पोहचले. तरीही दरवाढ सुरूच आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूवर होऊन महागाई वाढली आहे. आधीच कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या नागरिकांची आर्थिक स्थित खालावली असल्याने केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत सोमवारी निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक घेऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.
देशात ५० दिवसांत ३५ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूवर होऊन महागाई वाढली आहे. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. जीवनावश्यक वास्तूच्या किमती नियंत्रणात आणाव्या, सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक बळकट करून सर्व नागरिकांना रेशनद्वारे डाळी, खाद्य तेल, साखर, चहा, मसाले, अन्नधान्य प्रति १० किलो दरमहा मोफत देण्यात यावे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी. कोरोना प्रतिबंध लास मोफत द्यावी. पुढील महिन्यासाठी देशातील असंघटित कष्टकऱ्यांना दरमहा ७ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य करावे, या मागण्यांचाही समावेश होता. यावेळी वरूड तालुका कौन्सिलचे सुखलाल कैथवास, कैलास बेलसरे, पंजाब काळे, सुरेंद्र काळे, मारोतराव धुर्वे, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर वाघमारे, रोशन वाघमारे, कायामुद्दीन पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.