शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मध्यवर्ती कारागृहालगतचा परिसर काळोखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:15 AM

महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवळणावर अपघाताची शक्यता : कैद्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.साडेआठ लाख लोकसंख्येची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या हद्दीतील चपराशीपुरा चौकापासून चांदूर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अवरुद्ध तर झालाच आहे. शिवाय, प्रचंड वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या एका भागाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गाने ये-जा करावी लागत आहे. त्यातही पथदिवे बंद असल्याने खड्ड्यांचा मार सहन करीत जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. किरकोळ अपघात घडत असून, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, महापालिकेला कधी जाग येणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.महापालिकेची कर वसुली नियमितचपराशीपुरा परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याने नागरिकांकडून नियमित कर वसूल करताना महापालिकेला हा आपल्या हद्दीतील परिसर वाटतो. मग, तेथील समस्या सोडविणे अगत्याचे नव्हे काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे.कारागृहाला धोक्याची संभावनायाच मार्गावर असलेल्या सेंट्रल जेलमध्ये विविध गुन्ह्यांतील गुन्हेगार बंदीस्त असून, हे कारागृह अधिक क्षमतेचे असल्याने येथे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यातील कैद्यांना शिफ्ट केला जातात. अशा स्थितीचा गैरफायदा घेऊन एकतर बंदी पळून जाऊ शकतात. तसेच बंदींसोबत वैमनस्य असलेल्या व्यक्तींकडून येथील अंधाराचा गैरफायदा घेत अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे व्हायला हवे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.या मार्गावरील काम सुरू असताना सर्व केबल तोडले गेले. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, त्यासंबंधी प्रकाश विभागाशी बोलून त्वरित तोडगा काढू.- बबलू शेखावत, नगरसेवक, वडाळी प्रभाग, अमरावती

टॅग्स :jailतुरुंगelectricityवीज