गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवकाळी पावसाने १० दिवस कहर केल्यानंतर तब्बल महिनाभराने केंद्रीय पथक पाहणीसाठी आले. तोवर शेतकऱ्यांनी रबीसाठीची मशागत केली. बुरसी आलेले सोयाबीन मिळेल त्या भावात विकले. त्यामुळे पथकाला नुकसानाची तीव्रता कशी कळेल, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. पथकाने नांदगावात विश्रामासाठी तासभर घालविला. मात्र, शेतकऱ्यांशी संवाद साधायला त्यांनी केवळ दोन मिनिटे दिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल, याविषयी शंकाच उपस्थित होत आहे.या नैसर्गिक आपत्तीच्या महिनाभरानंतर केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंग यांनी शुक्रवारपासून तीन दिवस पश्चिम विदर्भातील बाधित खरिपाची पाहणी केली. यामध्ये त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक बाधित असलेल्या नांदगाव तालुक्यातील जळू, दाभा, माहुली चोर आदी गावांना भेटी दिल्यात मात्र, दोन मिनिटांचाही अवधी त्यांनी दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. राज्याच्या सत्ताकारणात लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत. प्रशासन बेलगाम आहे. केंद्रीय पथकाचा दौरा लिलापोती करीत असल्याने शेतकºयांची व्यथा ऐकणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ९४ टक्के शेतकऱ्यांच्या शेती व फळपिकांचे ७८ टक्के नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्याचे अहवालाअंती स्पष्ट झाले. यामध्ये तीन लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील खरिपाची पिके नष्ट झाली. यामध्ये कॅशक्रॉप असणारे सोयाबीन दोन लाख १२ हजार ३२९ हेक्टर व पांढरे सोने असलेल्या कपाशीचे एक लाख ३५ हजार ४७२ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सवंगणी केलेले सोयाबीन जाग्यावरच सडले, काहींनी गंजी लावल्या होत्या, त्याला बुरशी लागली व शेंगांना कोंब आले. कपाशीची बोंडे सडली व जी बोंडे फुटली, तो कापूस ओला झाला व सरकीमधून कोंब निघाले. कापूस व सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. ज्वारीची कणसे काळवंडली, त्यामधील दाण्याला बिजांकुर निघाले, एकंदरित दहा दिवसांच्या अवकाळीने खरिपाची दैना झाली.रबीसाठी मशागत; नुकसान दिसणार कसे?आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नुकसान झाले, त्याच्या तब्बल महिनाभरानंतर केंद्राचे पथक पाहणीसाठी आले. तोवर शेतकºयांनी रबीच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत केल्यामुळे बाधित सोयाबीनचे केवळ अवशेष पथकाला दिसले. शिवाय कपाशीची सडलेली बोंडे गळून पडली. यामध्ये नुकसानीची तीव्रता जी ऑक्टोबर महिन्यात होती, ती नोव्हेंबरच्या अखेरीस येणार कुठून, असा शेतकºयांचा सवाल आहे.मिळेल त्याभावात विकले डागी सोयाबीनअवकाळीने सोयाबीनच्या गंजीला बुरशी चढली. त्यामुळे सोयाबीन डागी झाले. परिणामी मिळेल त्या भावात शेतकºयांनी सोयाबीनची विक्री केली. ही स्थिती केंद्रीय पथकाला कशी दिसणार? यामध्ये एकूण उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. जगावं कसं, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. थकबाकीदार असल्याने बँकांनी कर्ज दिल नाही. ५० हजारांवर शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही. रबीच्या कर्जवाटपास सुरुवात नाही. जिल्हा रबीचे कर्ज वाटप करीत नाही. याकडे लक्ष देणार कोण, असा शेतकºयांचा सवाल आहे.बागायती अन् फळपिकांच्या नुकसानीचे काय?अवकाळीने पपई, केळी, भाजीपाला आदी बागायती पिकांसह संत्रा, मोसंबी आदी बहुवार्षिक पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संत्राची फळगळ झाली. याची पाहणी पथकाने केलीच नाही. संयुक्त पंचनाम्यातदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. फळगळ झाल्याने व्यापारी सौदे करायला तयार नाही. शासन, प्रशासन, पथक अन् लोकप्रतिनिधींना वेळ नाही. त्यामुळे बागायती उत्पादकांना वाºयावर सोडल्याची स्थिती आहे.
केंद्रीय पथकाचा जिल्हा दौरा वांझोटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 6:00 AM
या नैसर्गिक आपत्तीच्या महिनाभरानंतर केंद्रीय कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंग यांनी शुक्रवारपासून तीन दिवस पश्चिम विदर्भातील बाधित खरिपाची पाहणी केली. यामध्ये त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाणून घेतली. त्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक बाधित असलेल्या नांदगाव तालुक्यातील जळू, दाभा, माहुली चोर आदी गावांना भेटी दिल्यात मात्र, दोन मिनिटांचाही अवधी त्यांनी दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
ठळक मुद्देबागायती, फळपिके बेदखल : नुकसानाच्या महिनाभरानंतर दोन मिनिटांची भेट