फोटो - कुर्हा २८ पी
कुऱ्हा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राला २७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सकाळी १० वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी किरण गावंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप भटकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता जैन, वैद्यकीय अधिकारी माकोडे व कर्मचारी उपस्थित होते. लसीकरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
---------------
गाय चोरून परस्पर विक्री
बेनोडा : तालुक्यातील झोलंबा येथील गाय लंपास करून परस्पर विकल्याची तक्रार प्रशांत वाघाडे (२६) यांनी बेनोडा पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी देविदास हरिभाऊ नेहारे (५५), अशोक कोसरे (५५) व पंकज अशोक कोसरे (२६) यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३७९, ४११, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. २० एप्रिल रोजी ही घटना घडली.
--------
मुलीला फूस लावून पळविले
परतवाडा : टॅल्कम पावडर आणण्यासाठी घराबाहेर पडलेली १५ वर्षांची मुलगी १९ एप्रिलपासून बेपत्ता आहे. ितला फूस लावून पळविण्यात आल्याची तक्रार परतवाडा पोलिसांत २७ एप्रिल रोजी देण्यात आली. याप्रकरणी संशयित करण सुनील ढाबरे (१९) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
------------
क्षुल्लक कारणावरून शेतकऱ्याला मारहाण
तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबा येथे शेतात जागल करून घरी परतणारे नागसेन लक्ष्मणराव धवने यांना मधुकर धवने व सुनील धवने यांनी पकडले, तर सुधाकर धवने याने लोखंडी सळाखीने मारहाण केली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------