जिल्हा परिषद : गाव विकासाकरिता महत्त्वाच्या टिप्स
अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व सरपंचांकरिता संवादाचे आयोजन २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. ऑनलाइन पध्दतीने पार पडलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ४२१ सरपंचांनी सहभाग नोंदविला. सीईओ अविश्यांत पंडा यांनी सरपंच संवादादरम्यान गावा विकास, शाश्वत विकास, वित्त आयोग, ग्रामस्थ सेवा सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला, सुका व न कुजणारा कचऱ्याचे कुटुंबस्तरावर विलगीकरण आदी बाबीवर महत्त्वाच्या टिप्स सरपंचांना दिल्या.
गावातील प्रत्येक नागरिकाला ई- सेवा मिळावी सर्व ग्रामस्थांचे काम गावातच व्हावे या सर्व बाबीतून गावाचा विकास व्हावा कशापध्दतीने होऊ शकतो. याबाबत सरपंच संवादाला मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी तसेच आदर्श ग्राम खिरगव्हाण येथील आदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे,शशिकांत मंगळे यांनी सरपंच संवादामध्ये सहभाग घेऊन सरपंचांना मार्गदर्शन केले तसेच सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासोबत विविध बाबीवर प्रामुख्याने सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन विषयावर संवाद साधला. तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, बी.आर.सी. आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिनेश गाडगे तर आभार प्रदर्शन प्रशांत सातव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप बद्रे यांनी केले.