अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे रखडलेली विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गतिमान होत आहे. राज्यातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व बीएस्सी कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ फाईन आर्ट अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखांबाबत ही माहिती जाहीर केली. पुन्हा काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.संबंधित सीईटी परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्डच्या साह्याने प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व परीक्षांच्या दरम्यान आवश्यक खबरदारी बाळगली जाणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी उपाय योजना केल्या जातील. तसेच विद्यार्थ्यासाठी आवश्यक सूचना प्रवेशपत्रावर नमूद केले असल्याचे सीईटीसेल तर्फे कळविले आहे.परीक्षांचे वेळापत्रकएमएएच- एमआर सीईटी (आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी)एमएएच एम एच एमसीटी सीईटी(हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी)एमएएच एमपीएड सीईटीफिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर(शिक्षण शास्त्र पदव्युत्तर पदवी)१० ऑक्टोबरएमएएच एमसीए सीईटी(एमसीए पदवीत्तर पदवी)एमएएच बी एचएमसीटी सीईटी(हॉटेल मॅनेजमेंट पदवी)एमएएच बी एड एम एड सीईटी (शिक्षण शास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी)११ ऑक्टोबरएमएएच एलबी ५ (वर्ष) सिईटी (विधी अभ्यासक्रम, बारावी नंतर पदवी)एमएएच बी ए. बीएस्सी बी.एड (इंटिग्रेटेड) (शिक्षण शास्त्र)एमएएच बी.पी.एड सीईटीफील्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर
सीईटीचे वेळापत्रक जाहीर, कोरोनामुळे परीक्षा केंद्रांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 8:48 PM